Next
लायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ
डॉ. नरेंद्र जाधव, स्वामी ज्ञानवत्सल गुंफणार पहिले पुष्प
BOI
Tuesday, January 15, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

लायन्स व्याख्यानमालेबाबत माहिती देताना व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक लायन प्रकाश नारके. या वेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, शरद पवार, राजेंद्र गोयल, दिलीप निकम, शाम खंडेलवाल उपस्थित होते.

पुणे : ‘दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स डिस्ट्रिक्ट 3234 डी 2, लायन्स इनोव्हेशन फोरम आणि आकुर्डी येथील सूर्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देणे लायनीझमचे-लेणे व्याख्यानमालेचे’ या लायन्स व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत पहिल्या पुष्पाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक लायन प्रकाश नारके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

‘हा उद्घाटन सोहळा रविवारी, २० जानेवारी २०१९ रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. व्याख्यानमालेच्या या पहिल्या पुष्पात केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू खासदार डॉ. नरेंद्र जाधव व अहमदाबाद येथील अक्षरधाम, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे परमपूज्य स्वामी ज्ञानवत्सल यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. जाधव ‘भारतीय अर्थव्यवस्था : आजची व उद्याची’ यावर, तर स्वामी ज्ञानवत्सल ‘सुखाची परिभाषा आणि जीवनाची श्रीमंती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

डॉ. नरेंद्र जाधव
‘लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन्स रमेश शहा यांनी या वर्षी ‘मिशन इनोव्हेशन’ या घोषणेद्वारे समाजहितासाठी अनेक नाविन्यपूर्ण सेवाप्रकल्प सादर केले असून, त्याला समाजाच्या सर्वच स्तरातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ‘लायन्स व्याख्यानमाला’ हा त्यातीलच एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. यापुढे प्रत्येक वर्षी ही लायन्स व्याख्यानमाला आयोजित केली जाणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा, जितो पुणे व विश्वकर्मा विद्यापीठ या संस्था या उपक्रमासाठी सहयोगी आहेत. शारदोत्सवाचा उपक्रम असणारी ही व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली असणार आहे,’ असेही  नारके यांनी नमूद केले. 

स्वामी ज्ञानवत्सल
या वेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन रमेश शहा, लायन शरद पवार, लायन राजेंद्र गोयल, लायन दिलीप निकम, लायन शाम खंडेलवाल उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 36 Days ago
Hope , this becomes a regular , annual event . Are there other cities with similar activities ? Hope , there are . Do they get good response ?
0
0
Ln Laxmikant Joshi About 159 Days ago
Lions club of Pune Maitri
0
0
Ln Prakash kotecha About 159 Days ago
Good speakers and to gain knowledge from them .This is a innovative programme first time in lionism .Thanks to our DG n his team for organising
0
0
Sunita Kulkarni,LCP Supreme About 159 Days ago
Attending Lions Vyakhaynmala
0
0

Select Language
Share Link
 
Search