Next
‘महिंद्रा फर्स्ट’ने पार केला १ दशलक्ष कार सेवेचा टप्पा
प्रेस रिलीज
Thursday, December 14 | 03:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारताची सर्वात मोठी मल्टी-ब्रॅंड कार सर्व्हिस वर्कशॉपची साखळी आणि १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्व्हिसेसने ‘एक दशलक्ष कार्सनां सर्व्हिस' देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.

‘यू आर इन वन मिलियन कार कॅम्प’ सर्व फ्रेंचाइजमध्ये ११ डिसेंबर २०१७ ते १२ जानेवारी २०१८ दरम्यान सुरू राहणार आहे. मोहिमेत एमएफसी सर्व्हिस कार्यशाळेत ३६० अंश कार चेकअपसहित इतर सेवा सवलतीच्या दरात मिळणार आहेत. काही आकर्षक बक्षिसे जसे आंतरराष्ट्रीय ट्रिप्स किंवा फ्री सर्व्हिस पॅकेज या काळात ग्राहक जिंकू शकणार आहेत.

देशातील कार्सची एकूण अंदाजित संख्या ३१.३ दशलक्ष असून ती २०२०पर्यंत ४४.७ दशलक्ष इतकी वाढण्याची शक्यता आहे. ज्यातील ३६ टक्के गाड्यांचे वय ४ ते ८ वर्षे असेल. भारतातील गाड्यांच्या देखभालीची गरज ओरीजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्स (ओइएम) डीलर्सच्या कार्यशाळेमार्फत दिली जाते. ज्याचा बाजारपेठेतील एकंदर वाटा ३२ टक्के आहे, स्वतंत्र गॅरेजेसचा (आयजी) ६४ टक्के वाटा आहे आणि बाकीचा संघटीत मल्टी-ब्रॅंड आउटलेट्सकडे (एमबीओ) आहे. संघटीत एमबीओ बाजारपेठ २०२०पर्यंत दुप्पट होणे अपेक्षित आहे. एमएफसी सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. ज्यामध्ये विविध ब्रॅंड्सच्या कार्संना सर्व्हिससाठी क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील.

‘हा मैलाचा टप्पा ‘महिंद्रा फर्स्ट चॉईस’साठी अभिमानाचा क्षण आहे,’ असे महिंद्रा समूहाचे आफ्टर-मार्केट सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह अध्यक्ष राजीव दुबे म्हणाले. ‘देशातील विखुरलेल्या कार सर्व्हिस क्षेत्रात पारदर्शकता आणण्याच्या हेतूने आम्ही आमचा प्रवास सुरू केला. ज्यामध्ये मूल्य विधान हे विश्वास आणि श्रेष्ठ ग्राहक अनुभवावर आधारित होते. या यशाने आम्हाला इंडियन वेहिकल आफ्टर मार्केट मध्ये सर्व्हिसचे नवीन बेंचमार्क्स निर्माण करायला प्रेरणा मिळेल,’ असे ते म्हणाले.

‘ग्राहकांचे मूल्य विधान सुधारणे हे एमएफसी सर्व्हिसेसमध्ये आम्ही देऊ करत असलेल्या उपायांच्या केंद्रस्थानी आहे. आम्ही आमच्या फ्रॅंचाइजीबरोबर अगदी जवळून काम करतो जेणेकरून आमचे तंत्रज्ञ सर्व ब्रॅंड्स सर्व्हिस करण्यात आणि कार्यशाळेत वापरण्यात येणाऱ्या प्रक्रिया, स्पेअर्स, डायग्नोस्टिक टूल्स आणि वापरलेली उपकरणे यात कुशल असतील, ज्यामुळे कठोर दर्जा मानकांचे पालन केले जाते. सर्व ब्रॅंडच्या अधिकृत सेवा केंद्रांशी तुलना केल्यास ग्राहक आमच्या कार्यशाळेत २० टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात. एक दशलक्ष गाड्यांची सर्व्हिस हा मैलाचा टप्पा पार करणे हे सिद्ध करते की आमच्या प्रयत्नांची ग्राहकांकडून प्रशंसा होत आहे आणि ग्राहक त्याचे महत्व जाणतात,’ असे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायव्हीएस विजयकुमार म्हणाले.

‘महिंद्रा फर्स्ट’मध्ये बॉडी रिपेअर्सपासून ते व्हील अलाईनमेंट आणि बॅलेन्सिंग ते ठराविक कालावधीनंतर देखभाल आणि मूल्यवर्धित उत्पादने आदींद्वारे संपूर्ण कार मेंटेनन्स आणि सर्व्हिस सोल्यूशन उपलब्ध आहेत. फ्रेंचाइज कार्यशाळांमध्ये कौशल्यसंपन्न तंत्रज्ञ आहेत जे सर्व गाड्यांच्या सर्व्हिसविषयक गरजा सांभाळू शकतात. खासकरून मारुती, हुंदाय, टाटा आणि महिंद्रा या गाड्यांच्या ज्यांचा बाजारातील अंदाजित हिस्सा ७९ टक्के आहे.

२२ राज्यातील ३२८ फ्रेंचाइजी वर्कशॉपसहित एमएफसी ठामपणे आपल्या वॉरंटी बाहेरील गाड्यांच्या सेवादात्यांमध्ये २०१८पर्यंत पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवण्याच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. कंपनी ग्राहकांच्या अनुभवात डिजिटलायझेशनद्वारे सतत सुधारणा करत आहे आणि कारवर्क्झ ही कार सर्व्हिसिंग वर्कशॉप ऍग्रीगेटर सेवा आणली आहे. ग्राहकांचा कार्यशाळांमधील आकडा वाढवण्यासाठी विमा कंपन्या आणि फ्लीट ऑपरेटर्सबरोबर भागीदारीचा पर्यायदेखील कंपनी पडताळत आहे. देशभरात आपले जाळे १२०० कार्यशाळांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे.

कंपनी आघाडीच्या विमा कंपन्यांद्वारे रोकड विरहीत विमा सुविधा आणि सुलभ बुकिंग सेवा देते. गाड्यांचे मालक कार्यशाळेत फोन करून किंवा संकेतस्थळावरून सर्व्हिस बुक करू शकतात. वेबसाईटवर कार डेंट एस्टीमेटर, रोडसाईड असिस्टन्स आणि वॉरंटी बियोंड वॉरंटी अशी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link