Next
अच्युतराव पटवर्धन शिक्षण सेवाव्रती पुरस्कार ज्ञानप्रबोधिनीला प्रदान
BOI
Thursday, September 06 | 09:04 PM
15 0 0
Share this story

ज्ञानप्रबोधिनी संस्थेला पहिला अच्युतराव पटवर्धन शिक्षण सेवाव्रती पुरस्कार प्रदान करताना केशव काकतकर आणि रमेश पटवर्धन. डावीकडून विलास केळकर, चंद्रकांत घवाळी, नचिकेत जोशी, बाबा शिंदे, संजय जोशी, श्रीराम भावे, विनायक हातखंबकर, विनय परांजपे, विजय वाघमारे

रत्नागिरी : ‘कोकणातील संस्थेने मराठवाड्यातील आमच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेला पुरस्कार देणे यात कोकणाचे प्रेम दडले आहे. हरळी-उस्मानाबाद येथे २५ वर्षांपूर्वी भूकंपग्रस्तांना मदत व शाळा, गावांची उभारणी केली. माणसे घडली, तर त्यातून राष्ट्र घडेल. आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवणारे गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतोय,’ असे प्रतिपादन निवृत्त कमांडर अभिजित व गौरी कापरे यांनी केले.

रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाचा पहिला गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन शिक्षण सेवाव्रती पुरस्कार मिळाल्यानंतर ते बोलत होते. पटवर्धन हायस्कूल येथे निवृत्त शिक्षक केशव काकतकर व अच्युतरावांचे सुपुत्र निवृत्त शिक्षक रमेश पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अच्युतरावांचे सहकारी हरी करमरकर, एस. एन. जोशी, नरेंद्र भाटवडेकर, एस. के. जोशी, शीतल कुलकर्णी, सौ. शेट्ये, श्रीमती सरमुकादम, अच्युत फडके, केशव काकतकर, रमेश पटवर्धन आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी मिलिंद गोरे यांनी संस्थेला एक लाख २५ हजार रुपयांची देणगी दिली. शाळेचे माजी विद्यार्थी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी सांगितले, ‘अच्युतराव म्हणजे एक विद्यापीठ. त्यांच्या विचार संक्रमणाची यात्रा ३९ वर्षे सुरू आहे. संस्थेने त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला, हे चांगले आहे. आज सर्वांनी जिथे असू, तिथे थोडे थोडे ‘अच्युतराव’ बनण्याचा प्रयत्न करावा.’

या कार्यक्रमाला संस्थेचे उपकार्याधध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, संस्था पदाधिकारी विलास केळकर, खजिनदार चंद्रकांत घवाळी, सीए नचिकेत जोशी, बाबा शिंदे, संजय जोशी, विनायक हातखंबकर, सहकार्यवाह विनय परांजपे, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक विजय वाघमारे, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अनंत सावंत यांना, आदर्श बालवाडी विभाग शिक्षिका सुविधा नार्वेकर, सेविका पुरस्कार प्रभावती पात्ये आणि कृतिशील पुरस्कार सत्यवान कोत्रे यांना प्रदान करण्यात आला.

(पुरस्कार प्रदान सोहळ्याची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link