Next
नात्यांची गुंफण करणारा ‘खिचिक’
वेगळ्या नावामुळे चित्रपटाची जोरदार चर्चा
BOI
Tuesday, July 23, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कोणताही चित्रपट हिट होण्यामागे त्याच्या नावाचा वाटा मोठा असतो. चित्रपटाचे आकर्षक नाव प्रेक्षकांना तो पाहण्यास उत्सुक करत असते. सध्या अशाच एका चित्रपटाची त्याच्या वेगळ्या नावामुळे चर्चा सुरू आहे. ‘खिचिक’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टरही नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळे असल्याने ते लक्षवेधी ठरत आहे. 

कांतानंद प्रॉडक्शनच्या सचिन अनिल धकाते यांनी ‘खिचिक’ या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रीतम एस. के. पाटील यांनी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांना सहकुटुंब बसून पाहता येईल असा हा चित्रपट असून, एका वेगळ्या प्रकारची कथा यातून दाखवली जाणार असल्याचे दिग्दर्शक पाटील यांनी सांगितले आहे. 

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून हे वेगळ्या प्रकारचे पोस्टर लक्षवेधी ठरत आहे. एक पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या एका कागदावर वेगवेगळे फोटो आहेत. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या नावावरून फार काही समजत नसल्याने या चित्रपटात नेमके काय दाखवण्यात येणार आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या विषयाला घेऊन प्रेक्षक उत्सुक आहेत. 

चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, सुदेश बेरी, अनिल धकाते, प्रथमेश परब, शिल्पा ठाकरे, पॉल मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search