Next
‘बार्बी’ची नवीन रूपात भारतातील प्रख्यात स्थळांना भेट
प्रेस रिलीज
Tuesday, May 08 | 03:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मॅटेल टॉइजची शाखा ‘बार्बी’ने भारताच्या विविध सांस्कृतिक पैलूंमधून प्रेरणा घेत खास भारतासाठी डॉल्स कलेक्शन सादर केले. कलर्स ऑफ इंडिया सिरीजमधील कलेक्टिबल्समध्ये ‘बार्बी’ सहा विविध रूपांमध्ये दिसणार आहे. देशातील सहा हेरिटेज स्थळांना अनुसरून ही सहा रूपे तयार करण्यात आली आहेत.

कलर्स ऑफ इंडिया सिरीज प्रत्येक आयकॉनिक स्मारकाच्या पैलूंना सादर करते. विविध संस्कृतींना सादर करणार्‍या कलेक्शनमधील प्रत्येक बाहुलीमध्ये भारताचे वैविध्यपूर्ण सौंदर्य दिसून येते. ‘बार्बी’ने या कलेक्शनमध्ये आयकॉनिक भारतीय हेरिटेज स्थळांच्या सांस्कृतिक पैलूंना समाविष्ट केले आहे, ज्यामध्ये पारंपारिक पोशाखामधील समकालीन डिझाइन्सचा समावेश आहे. प्रत्येक डिझाइनसाठी भारतातील स्मारकांच्या आर्किटेक्चरल व डिझाइन घटकांमधून प्रेरणा मिळाली आहे, जसे गुलाबी शहर जयपूरमधील हवा महलचे ‘झरोके’, महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांमधील गूढ शिल्पकला, महालांचे शहर मैसूरमधील मैसूर पॅलेसचा भव्य परिसर, मदुराईमधील दक्षिण भारतीय हेरिटेज महाल थिरुमलाई नायकर महालच्या भव्य कमानी, सिक्किमच्या गोम्पासमधील विविध रंग आणि भारतातील जागतिक सात आश्‍चर्यांपैकी एक ताजमहालच्या संगमरवरी लाद्यांवरील आकर्षक चमक. हे सर्व घटक बाहुल्यांच्या डिझाइन्स व पॅकेजिंगमध्ये उत्तमरित्या समाविष्ट करण्यात आले आहेत.

कलर्स ऑफ इंडियाबाबत बोलताना मॅटेलच्या विपणन विभागाचे प्रमुख लोकेश कटारिया म्हणाले, ‘मॅटेलमध्ये आम्ही नेहमीच सर्जनशील खेळाच्या माध्यमातून विकासाला प्रोत्साहित केले आहे. आमचा विश्‍वास आहे की बाहुलीसोबत खेळताना तुमच्या मनात अनेक शक्यता निर्माण होतात. आम्हाला घराघरामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या बार्बीचे कलेक्शन सादर करताना खूप आनंद होत आहे. या एडिशनसह आम्ही देशातील विविध प्रख्यात स्थळांमधील वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीला समोर आणत आमच्या ग्राहकांसोबत सलोख्याचे नाते तयार करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय स्थळांना बार्बीची भेट ही अनोखी संकल्पना अंमलात आणत आम्ही तरुण मुलींमध्ये कुतूहलता निर्माण करण्याचा आणि त्यांना खेळाच्या माध्यमातून भारतीय संपन्न संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो.’

डिझाइन ओर्बने पॅकेजिंग डिझाइन्सची संकल्पना तयार केली. या रेंजबाबत बोलताना डिझाइन ओर्बच्या संस्थापिका व संचालिका पूर्णिमा बुर्ते म्हणाल्या, ‘लहान मुलींना बार्बीसह आपल्या देशाची ओळख करून देण्यामध्ये मदत करण्यासाठी डिझाइन तयार करण्याची आमच्यासाठी ही उत्तम संधी होती. कलर्स ऑफ इंडिया सिरीजने भारतीय संदर्भामध्ये बार्बीला सामील केले आहे. बार्बीला भारताबाबत कुतूहलता आहे आणि ती भारताबाबत अधिक जाणून घेण्याच्या प्रवासावर निघाली आहे. तिने भेट दिलेले प्रत्येक स्थळ, त्यांचे अनोखे आर्किटेक्चर, रचना व संस्कृती पाहून प्रोत्साहित झाली आहे आणि ती भेट देणार्‍या प्रत्येक स्थळाची संस्कृती आपल्यामध्ये सामावण्याचा प्रयत्न करत आहे.’

‘प्रत्येक पॅक भारताच्या कानाकोपर्‍यातील विविध अद्भुत स्थळांच्या गाथेला सादर करते. प्रत्येक स्थळाच्या स्मारकांमधून संस्कृती, रचना व आर्किटेक्चरल स्टाइल्सची निवड करण्यात आली आहे. बार्बी तिच्या सर्व लहान मैत्रिणींचे स्वागत करत त्यांना या प्रवासामध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करते,’ अशी माहिती बुर्ते यांनी दिली.

कलर्स ऑफ इंडिया सिरीज प्रमुख रिटेल स्टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्ध असेल. बार्बीचा भारतभरातील प्रवास या थीमवर आधारित पॅकमध्ये मिनी डीआयवाय किट देखील आहे, जेथे मुली बाहुलीसाठी पेपर सूटकेस बनवू शकतात. मॅटेल टॉइजने ‘प्ले विथ पर्पझ’ या मूलभूत तत्त्वाला अनुसरून आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक लीडरने तयार केलेल्या प्रत्येक खेळण्यामध्ये या तत्त्वाशी निगडित बाबी समाविष्ट आहेत. ५८ वर्षांहून अधिक काळापासून ‘बार्बी’ने मुलींना स्वावलंबी बनण्यामध्ये साह्य केले आहे. १८० हून अधिक प्रेरणादायी करिअर्स व कलेक्टिबल्सच्या वैविध्यपूर्ण रेंजनंतर बार्बी तिच्या मैत्रिणी व कुटुंबासह मुलींच्या भावी पिढीला प्रोत्साहित करते की त्या जीवनात काहीही बनू शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link