Next
पडघ्यातील पाटील इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शन
विविध प्रकल्पांतून पर्यावरणाविषयी जनजागृती
मिलिंद जाधव
Tuesday, December 18, 2018 | 05:38 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टी. ए. पाटील इंग्रजी शाळेत नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या शालांतर्गत विज्ञान प्रदर्शनात शाळेतील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि ३५ विज्ञान प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले होते. पर्यावरणाविषयी जागृती करणाऱ्या आणि विज्ञानप्रसार करणाऱ्या विषयांवर आधारित प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेले पाहायला मिळाले. अनेक विषयांची माहिती जनसामान्यांना व्हावी, यासाठी माहितीपूर्ण प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी, तसेच पडघा परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली.विज्ञान प्रकल्प पाहायला आलेल्यांना विद्यार्थी माहिती देत होते. त्यांच्याकडे पालक वर्ग कुतूहलाने पाहत होता. जागतिक तापमानवाढ, पर्यावरण, प्रकल्प, पाण्याची बचत, विकसित शहरे, वृक्षारोपण, टाकाऊपासून टिकाऊ, विजेची बचत, पाणीबचत अशा अनेक विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जीवनविद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील, टी. ए. पाटील  इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात, उपमुख्याध्यापिका ममता शेलार, शालेय शिक्षण विभाग अध्यक्ष संजय पटेल, शशांक तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विज्ञान विभागाचे उषा अगोणे, रवी घारे, उमेरा ठाणावाला, आदिती तांबोळी, विवेक नागावेकर, अश्विनी व्यापारी, तुप्ती गंधे, अनिकेत थेटे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक वर्गाने यासाठी परिश्रम घेतले. ‘पर्यावरण संरक्षण जागृतीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे विज्ञान व पर्यावरणाशी असलेले नाते वाढावे यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे,’ असे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link