Next
‘ध्येय सुंदर असेल, तर प्रवासाची चिंता कशाला’
क्रिकेटपटू कपिल देव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
BOI
Wednesday, November 21, 2018 | 01:27 PM
15 0 0
Share this story

विद्यार्थ्यांसह कपिल देव

पुणे : ‘ध्येय सुंदर असेल, तर प्रवासाची चिंता कशाला करता’ आपण जे काही कष्ट घेत असू, त्यातून मिळणारे यश सुंदर असेल, तर वाटेत येणाऱ्या अडीअडचणींची चिंता कशाला करायची. ते मौल्यवान डेस्टीनेशन डोळ्यापुढे ठेवा आणि मग बघा.. तुमचा प्रवासही सुंदरच होईल’, असा सल्ला क्रिकेटचा देव कपिल देव यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

नुकतीच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पुण्यातल्या फ्लेम विद्यापीठाला भेट दिली आणि   विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी फ्लेम युनिव्हर्सिटीचे  द्वारिका प्रसाद उनियाल यांनी त्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना कपिल देव म्हणाले, ‘तुम्ही या देशाचे भविष्य आहात. तरुणांकडे जी ऊर्जा आहे, ती  अद्वितीय आहे. तुम्ही काहीतरी मूळ करा. एक आघाडीवर असतो, इतर सगळे त्याला फॉलो करतात. लोकांच्या हातांवर स्वाक्षरी देणाऱ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या लोकांमध्ये नेतृत्त्वाची क्षमता असते. ते लोकांना त्यांचे विचार स्पष्ट करण्यासाठी, मनातले विचार प्रकट करण्यासाठी मदत करतात.’


विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. विचार, इच्छा आणि भावनांमध्ये स्पष्टता असावी यावर त्यांनी जोर दिला. ‘विद्यार्थ्यांनी नेहमीच आपल्या शिक्षणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.  मी अभ्यासाचा गांभीर्याने विचार केला नाही याचा मला पश्चात्ताप आहे. विद्यार्थीद्शेतला काळ हा सुवर्णकाळ असतो, त्याचा चांगल्याप्रकारे उपयोग केला पाहिजे. जेव्हा आपण स्कोअर करू शकत नाही तेव्हा नेटवर परत जा आणि प्रॅक्टिस करा. तुम्हाला गुण मिळत नसतील तर पुन्हा, पुन्हा अभ्यास करा. तुम्हीन पुरेसे परिश्रम घेतले नाहीत, तर तुम्हालाच दडपण जाणवेल.’

भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करु दया, त्यांचे पालक म्हणून राहण्याऐवजी मित्र बना’, असा सल्लाही त्यांनी दिला.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link