Next
होमो डेअस
BOI
Monday, April 29, 2019 | 10:12 AM
15 0 0
Share this article:

युवाल नोआ हरारी यांनी ‘सेपियन्स’मधून मानवाची उत्क्रांती सांगत देव, धर्म, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य अशा संकल्पना निर्माण करून त्याने जग कसे काबीज केले, याचे वर्णन केले आहे. युवाल यांनी त्यांचे पुढील पुस्तक ‘होमो डेअस’मधून तिसऱ्या सहस्रकात मानवासमोरील दुष्काळ, साथीचे रोग आणि युद्ध या संकटांची चर्चा करीत मानवाने त्यावर मिळवलेले नियंत्रण कसे आणले हे स्पष्ट केले आहे. 

होमो सेपियन्स हे सर्वांत विकसित रूप कसे आहे, मनुष्य व अन्य प्राण्यांमधील फरक, जगाला दिलेला नवा अर्थ, देव-धर्म या पलीकडे तंत्रज्ञान, बुद्धिमान रचनांमधील नव्या संकल्पना या पुस्तकातून स्पष्ट केल्या आहेत. एकविसाव्या शतकातील स्वप्न आणि दु:स्वप्न यांचा मागोवा घेत सामोरे जाव्या लागणाऱ्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केली आहे. म्हणूनच उत्क्रांतीचा पुढचा टप्पा हा होमो डेअस असेल, देव-माणसाचा असेल, असे यात म्हटले आहे. याचा मराठी अनुवाद सुश्रुत कुलकर्णी यांनी केला आहे.    

पुस्तक : होमो डेअस
लेखक : युवाल नोआ हरारी 
अनुवादक : सुश्रुत कुलकर्णी
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पाने : ५०२
किंमत : ५०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search