Next
'पेटीएम'ची एटीएम सुविधा सुरू
प्रेस रिलीज
Monday, December 11 | 12:14 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारताची सर्वात मोठी डिजिटल बँक ‘पेटीएम पेमेंटस्’ या बँकेने 'पेटीएम का एटीएम' केंद्र सुरू केले आहे. ज्यात ग्राहकांना बचत खाते उघडण्याची व त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची किंवा खात्यात पैसे ठेवण्याची सुविधा मिळते. पेटीएम पेमेंट्स बँक ही एकमेव बँक आहे; जी शून्य शिल्लक खात्यांची आणि डिजिटल व्यवहारांवर शुल्क न घेण्याची सुविधा देते. ही विशेष केंद्रे ग्राहकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

पहिल्या टप्प्यात, पेटीएमने दिल्ली एनसीआर, लखनऊ, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी आणि अलीगडसारख्या काही निवडक शहरांत तीन हजार एटीएम केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये स्थानिक बँकिंग प्रतिनिधी आहेत, जे ग्राहकांना त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात पैसे भरण्यास व त्यातून पैसे काढण्यास मदत करतील. दक्षिण आणि पूर्व भागांसह देशभरात आणखी एक लाख पेटीएम का एटीएम बँकिंग केंद्रे सुरू करून, समस्त देशात बँकिंग सेवा विस्तारित करण्याचा कंपनीचा मानस आहे.

कंपनीने पेटीएम अॅपवर खास ‘बँकिंग’ विभाग देखील दाखल केला आहे, ज्यात पेमेंट, डिजिटल डेबिट कार्ड, पासबुक, मदत व इतर बँकिंग सेवा उपलब्ध असतील. सर्व लोकांना आर्थिक प्रवाहात सामील करून घेण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी या बँकेची रचना करण्यात आलेली आहे आणि अर्ध्या बिलियन भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या त्यांच्या मिशनशी सुसंगत असा हा प्रयत्न आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेणु सत्ती म्हणाल्या, “पेटीएम का एटीएम  बँकिंग केंद्र हे प्रत्येक भारतीयाला बँकिंग सुविधा मिळाव्यात; या दृष्टीने आम्ही टाकलेले पाऊल आहे. या सुविधेमुळे आमच्या ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या विश्वसनीय केंद्रात जाऊन बँक खाते उघडता येईल, पैसे भरता, काढता येतील आणि आधार कार्ड संलग्न करता येईल. आमचा विश्वास आहे की, हे स्थानिक बँकिंग मॉडेल, आजवर वंचित राहिलेल्या व पुरेशा सेवा न मिळालेल्या लक्षावधी ग्राहकांना उत्तम दर्जाची बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.”

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link