Next
सागर देशमुख ‘मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार
प्रेस रिलीज
Wednesday, July 24, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने ‘भाई– व्यक्ती की वल्ली’, ‘हंटर’ अशा चित्रपटांतून वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सागर देशमुख आता मोहित टाकळकर यांच्या ‘मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार आहे. विधी कासलीवाल यांच्या लॅंडमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘हंटर’, ‘वाय झेड’ आणि ‘गर्लफ्रेंड’नंतर सागरचा सईसोबत हा चौथा चित्रपट आहे.

या विषयी बोलताना विधी कासलीवाल म्हणाल्या, ‘सागर ‘मीडियम स्पाइसी’चा भाग असून, याचा आम्हाला आनंद आहे. या चित्रपटात अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा असून, सागरची व्यक्तिरेखा या कथेचा एक अविभाज्य भाग आहे.’ 

चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारल्यानंतर सागर सध्या डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारत आहे. शहरी जीवनातील नाते संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. 

दरम्यान, नाट्य क्षेत्रात विविध पुरस्कार मिळवणारे नाटककार अशी मोहित टाकळकर यांची ओळख आहे, तर विधी कासलीवाल यांची ओळख आशयसंपन्न व्यावसायिक चित्रपटांच्या निर्मात्या अशी आहे. ‘मीडियम स्पाइसी’च्या निमित्ताने हे दोघे एकत्र येत आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search