Next
गार्बेज
BOI
Tuesday, April 17 | 10:38 AM
15 0 0
Share this story

संजीवनी गोखले लिखित लघुकादंबरी, कथा, ललित लेख, आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक. सुमित्रा ही कादंबरीची नायिका आहे. कोकणातील वेंगुर्ल्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास अमेरिकेतील सिनसिनाटीमार्गे पुन्हा मुंबईत येऊन थांबतो. या प्रवासात तिला आलेले अनुभव, तिने पेललेली आव्हाने याची उत्कंठावर्धक कथा या लघुकादंबरीत वाचायला मिळते. डॉ. वा. ड. गोखले यांच्यावर आधारित ‘देवाघरची माणसे’ या लेखासह अन्य लेखही प्रामुख्याने व्यक्तीपर आहेत.

‘पसाऱ्यात सुख मानता मानता, पसाराच गोळा करायचा,’ ‘माझे माझे म्हणता म्हणता, माझेपणाचाच काटा रुतत चालला.... संसार करता करता, संसाराचा अर्थच बदलून गेला’, असे सांगणाऱ्या कवितांचा समावेश पुस्तकात आहे. ‘अस्सा कट्टा सुरेख बी’ हा आधुनिक ‘भोंडला’, ‘आजी’, ‘अॅलर्जी’ यांसारख्या कविताही वाचायला मिळतात.

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : १७२
किंमत : २६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)




 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link