Next
‘इरा किड्स स्कूल’चे स्नेहसंमेलन उत्साहात
BOI
Saturday, February 09, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील चिंचवडमधील ‘इरा किड्स स्कूल’ शाळेचे स्नेहसंमेलन नुकतेच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात संपन्न झाले. तसेच शाळेच्या तळेगाव आणि शिवणे येथील शाखांमधील शाळांचेही स्नेहसंमेलन नाना-नानी हॉल येथे घेण्यात आले. 

कार्यक्रमात ‘इरा किड्स’च्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी ‘निसर्ग’ ही संकल्पना विविध गाण्यांमधून प्रेक्षकांसमोर मांडली. शिवणे व चिंचवड शाखांच्या विद्यार्थ्यांनी ‘अवर लिटल स्टार्स’ (उद्याचे सितारे) ही संकल्पना सादर केली. तसेच विविध प्रकारच्या गीतांवर चिमुकल्यांनी ठेका धरला.

‘मुलांना काय शिकवावे, व का शिकवावे, हे पालकांना व शिक्षकांना माहित असणे आवश्यक आहे. मुलांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणे गरजेचे आहे. म्हणूनच मुलांचे मालक न बनता मुलांचे पालक बना’, असे संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी तिन्हीं शाखांमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांमधूनही सर्वोत्कृष्ट पालक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला ‘सरस्वती एज्युकेशनल फाउंडेशन’चे अध्यक्ष सुनील देसले, डॉ. लता, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला छाजेड यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले, तसेच संस्थेतील शिक्षकांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ‘सरस्वती शैक्षणिक संस्थे’च्या विश्वस्त सुरेखा देसले, प्रा. शिरीष अवधाने, शाळेचे संचालक दिलीप चौधरी व सुनिता चौधरी आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सोडमिसे, गौरी कुलकर्णी व तृप्ती राठोड यांनी केले, तर भाग्यश्री पवार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search