Next
वेतनाचे ९० लाख सचिनने दिले पंतप्रधान मदत निधीला
BOI
Monday, April 02, 2018 | 03:34 PM
15 0 0
Share this story

सचिन तेंडूलकर
नवी दिल्ली : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याने नुकताच आपला राज्यसभेचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या कार्यकाळात त्याला एकूण वेतन म्हणून मिळालेले ९० लाख रुपये त्याने पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले आहेत. आजवर राज्यसभेतील त्याच्या अनुपस्थितीबद्दल त्याच्यावर मोठी टीका झाली होती; मात्र कार्यकाळ पूर्ण करत असताना त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नुकताच राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या सचिनने संसदेतील आपल्या शेवटच्या भाषणात या निधीचा उल्लेख केला. आजवर सचिनने खासदार निधीसाठीच्या रकमेचाही योग्य विनियोग केला होता. दरम्यान, सचिनच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सचिनने आपल्या कार्यकाळात देशभरात १८५ योजना निश्चित करून, त्यासाठी मिळालेल्या ३० कोटी रुपयांमधून जवळपास सात कोटी रुपये मूलभूत विकास आणि शिक्षण क्षेत्रावर खर्च केले आहेत. 

याशिवाय आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने आंध्र प्रदेशातील ‘पुत्तम राजू केंद्रिगा’ आणि महाराष्ट्रातील ‘डोणजे’ ही दोन गावे दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी कार्य केले आहे. याव्यतिरिक्त त्याच्या मदतनिधीतून जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील एका शाळेच्या इमारतीसाठी ४० लाख रुपये दिले गेले आहेत. 

सचिन तेंडुलकरच्या या कार्यतत्परतेची आणि निर्णयाची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून एक आभार पत्र सादर करण्यात आले आहे. त्याद्वारे सचिनच्या या निर्णयाबद्दल त्याचे आभार मानले गेले आहेत आणि त्याने पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केलेल्या या रकमेतून संकटग्रस्त लोकांना मदत केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link