Next
आषाढी एकादशीनिमित्त ‘हाईक’वर खास स्टिकर
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 06:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘हाईक’ या लोकप्रिय मेसेंजर अॅपने विशेष स्टिकर पॅक सादर केला आहे. पंढरपूरच्या वारीचे भक्तीमय वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असताना या काळात आपल्या आप्तजनांना  संदेश पाठविण्यासाठी ‘हाईक’ने वापरकर्त्यांना हा खास स्टिकर पॅक उपलब्ध केला आहे.यामध्ये ‘शुभ आषाढी एकादशी’ अशी अक्षरे असलेल्या शुभेच्छा स्टिकर आहे. साधे एसएमएस पाठवण्यापेक्षा हा एक चांगला मार्ग देण्यात आला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टीमवर हा स्टिकर पॅक उपलब्ध आहे.

हाईकवर स्टिकर सर्वात लोकप्रिय फीचर आहे. हाईककडे ४० पेक्षा जास्त भाषांमधले २०हजारपेक्षा जास्त स्टिकर आहेत. हे स्टिकर्स विविध भावना दर्शवणारे आणि तुम्हाला नेमकं काय वाटत आहे ते सांगणारे आहेत. सण-उत्सव आणि प्रादेशिक संदर्भांची प्रेम, हास्य आणि धमाल यांची स्टिकर्स हाईकवर सर्वात लोकप्रिय आहेत. प्रतिदिवशी तब्बल तीस कोटीपेक्षा जास्त  स्टिकर्सची देवाणघेवाण होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link