Next
‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, June 16 | 04:48 PM
15 0 0
Share this story

‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे उद्घाटन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका आणि एमराल्ड ज्वेल इंडस्ट्री इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन यांच्या हस्ते झाले.

पुणे :   पुणे शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याबरोबरच सराफ व व्यापाऱ्यांच्या व्यवसायांच्या वाढीसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (ता. १६) पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका आणि एमराल्ड ज्वेल इंडस्ट्री इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झीबिशन सेंटर येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात जेम्स अँड ज्वेलरी व या संबंधित मशिनरींचे तब्बल ३२५ स्टॉल्स असून, जगभरातील रत्ने आणि दागिन्यांचे प्रकार, त्यासाठी वापरात असलेले तंत्रज्ञान, विविध डिझाईन्स, ट्रेंड्स व्यापाऱ्यांना एकाच छताखाली पाहता येणार आहेत. प्रदर्शनाचे हे सलग चौथे वर्ष असून, स्टायलस इव्हेन्ट्स इंडिया, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. सोमवार, १८ जूनपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन सुरू आहे. व्यापाऱ्यांना या प्रदर्शनासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link