Next
म्हाळू पार्वती प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:



पुणे : म्हाळू पार्वती प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुण्यातील दिव्यांग खेळाडू, दिव्यांगांचे प्रशिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात चार एप्रिल २०१९ रोजी झाला. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेंद्र गोळे, माजी नगरसेवक दत्ता बहिरट हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.



या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यात चेतन चोपडा (व्हॉलीबॉल), रोहित सावंत (स्विमिंग), किरण गवांदे (हॅंडबॉल), झुलेखा शेख (व्हॉलीबॉल), कॅमी पटनायक (स्केटिंग), सृष्टी बांदल (स्केटिंग), हुजेफा शेख (स्केटिंग), अभिश्रुत देवकर (पॉवर लिफ्टिंग), मनाली शेळके (पॉवर लिफ्टिंग) यांचा समावेश आहे. या दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या अशोक नांगरे, गिरीश भुजबळ, दैवत लिम्हण, अशोक जाधव, संतोष डोंगरे या प्रशिक्षकांची सत्कारही या वेळी करण्यात आला. सचिन पुणेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ नागरिकांना गौरविण्यात आले.



याच कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या शाळांना बॅटरीवरील ध्वनिक्षेपण यंत्रणा, मोबाइल संच, ट्रॅक सूट, बॅग, प्रथमोपचार पेटी असा संच भेट देण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश निकम यांनी स्वागत केले.  निलेश निकम, प्रकाश निकम, पूनम हेंद्रे, डॉ. संजय जोशी, विलास निकम, बबन निकम, शैलेश हेंद्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. बाळकृष्ण नेरकर यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश निकम यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search