Next
पुणे येथे ग्लोबल कम्युनिकेटर्स कॉन्क्लेव्ह
प्रेस रिलीज
Tuesday, February 20, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : फेसबुक ‘एपीएसी’ प्रमुख रमेश गोपालकृष्ण आणि अनुभवी अभिनेता अमित खन्ना पुण्यात नऊ मार्च रोजी होणाऱ्या दोन दिवसीय १२व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. मुख्यतः कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी पीआरसीआय आणि युथ विंग यंग कम्युनिकेटर क्लब (वायसीसी) नऊ मार्चच्या पहिल्या सहामाहीत सिम्बॉयोसिस विश्वभूजन ऑडिटोरियम, सेनापती बापट मार्ग, पुणे येथे एक खास संमेलन भरवण्यात येणार आहे.
 
जाहिरात, एचआर, मारकॉम प्रोफेशनल्स व मास-कम्युनिकेशनचे विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ, पीआर, मीडियासाठी प्रिमियर कम्युनिकेशन एक्सचेंज म्हणून उदयास आलेल्या पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी या भारतातील सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन करणार आहेत. ‘परिवर्तन करा किंवा नष्ट व्हा’ अशी इव्हेंटची थीम आहे.

या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आयआयटी कानपूर अॅल्यमनी असोसिएशनचे पुणे चॅप्टर आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा या विषयातील तंत्रज्ञान सत्रांमध्ये नॉलेज पार्टनर असेल.

संमेलनाचे अध्यक्ष आणि पीआरसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एन. कुमार म्हणाले, ‘तंत्रज्ञानातील जलद विकासांव्यतिरिक्त, आपले आजूबाजूचे जीवनही विचारांच्या वेगाहून अधिक वेगाने बदलत आहे. आपण आज जे पाहतो ते उद्या उपयुक्त वाटणार नाहीत. या झटपट विकासाला छोट्यामोठ्या बदलांची नाही, तर संपूर्ण परिवर्तनाची गरज आहे. म्हणूनच आम्ही पीआर, कॉर्प कॉम, मिडिया, सोशल मीडिया, अॅडव्हर्टायटिंग, क्राइसिस, एचआर, मॉनिटरिंग, सीएसआर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गव्हर्नन्स, फिल्म, अॅग्रीकल्चर, एनर्जी, अर्बन इन्फ्रा यासारख्या सब-थीमवर काम करत ‘परिवर्तन करा किंवा नष्ट व्हा’ या मुख्य विषयावर काम करण्याचा विचार करत आहोत.’

पीआरसीआयचे अनुभवी अध्यक्ष व मुख्य सल्लागार एम. बी. जयराम यांनी सांगितले की, ‘आम्ही अनेक नामवंत स्पीकर्स, कॉर्पोरेट दिग्गजांना, नेत्यांना बदलत आहोत आणि त्यांच्या निवडक क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या सर्वांना आमंत्रित करत आहोत. फेसबुकचे श्री. गोपालकृष्ण यांनी महत्त्वाची भाषणे देण्यास अनुमती दिली.

आयआयटी कानपूर अॅल्यमनी असोसिएशनच्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल म्हणाले की, ‘आजच्या जगात अतिशय वेगाने बदलत असलेल्या कम्युनिकेशन, प्रसारमाध्यम, जाहिरात आणि एचआर क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्या आजूबाजूच्या वेगवान विकासाला कारणीभूत असणाऱ्या बदलत्या टेक्नोलॉजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘परिवर्तन करा किंवा नष्ट व्हा’ ही समर्पक थीम निवडल्याचा खूप आनंद होत आहे.’

पीआरसीआय चाणक्य मालिकेअंतर्गत सर्वाधिक लोकप्रिय सिग्नेचर पुरस्कार घोषित करेल आणि पीआर हॉल ऑफ फेममध्ये विजेत्याला बोलावण्यात येईल. ‘पीआरसीआय’चे संचालक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. कुमार यांनी सांगितले की ‘आम्ही लोकप्रिय पीआरसीआय अॅवार्डला जोडून होतकरू कम्युनिकेशन प्रोफेशनल्सना पुरस्कार देणार आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search