Next
विद्यार्थ्यांना चांद्रयान बनवण्याची संधी
फेव्हिक्रिएटचा अभिनव उपक्रम
BOI
Friday, September 06, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-दोन मोहिमेबाबत देशातील भावी पिढीलाही उत्सुकता आहे. त्यांना याबाबत अधिक माहिती मिळावी या उद्देशाने फेव्हिक्रिएटने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्वतःचे चांद्रयान स्वतः बनवा’ ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत २५ शहरांतील ६५० शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना चांद्रयान व अंतराळाबद्दल सर्जनशील व रंजक पद्धतीने माहिती देण्यात येणार असून, यामध्ये संपूर्ण महिनाभर, फेव्हिक्रिएट या भावी शास्त्रज्ञांना स्वतःचे चांद्रयान बनवण्यासाठी उत्तेजन देणार आहे. 


त्यासाठी, पिडिलाइट व ‘फेव्हिकॉल ए-प्लस’ने तयार केलेल्या विशेष क्राफ्टिंग शीटचा वापर केला जाणार आहे. या शीटमध्ये त्यांना चांद्रयान-दोनमधील लँडर व रोव्हर; तसेच यान बनवण्याची माहिती दिली आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी एक चित्रफीतही तयार करण्यात आली आहे. या संदर्भात नेहरू प्लॅनेटोरिअमशीदेखील सहयोग करण्यात आला असून, तिथे होणाऱ्या एका कार्यशाळेत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना चांद्रयानाची प्रतिकृती तयार करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासाठी आणि ‘लर्निंग बाय डुइंग’ दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  


याबाबत नेहरू प्लॅनेटोरिअमचे संचालक डॉ. अरविंद परांजपे म्हणाले, ‘चांद्रयान-दोन ही देशासाठी ऐतिहासिक मोहीम आहे आणि मुलांनी त्याविषयी जाणून घेतले पाहिजे. फेव्हिक्रिएटच्या स्वतःचे चांद्रयान स्वतःच बनवा, या उपक्रमामुळे मुलांना अंतराळ मोहिमांविषयी सर्जनशील व रंजक पद्धतीने माहिती घेण्यासाठी व शिकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार आहे.’

पिडिलाइट इंडस्ट्रीज लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु भांजा म्हणाले, ‘मुलांना शिकण्यास मदत करण्यासाठी आर्ट व क्राफ्ट अतिशय प्रभावी आहे, असे आम्हाला वाटते. आर्ट्स व क्राफ्टमुळे मुलांना त्यांची क्षमता पूर्णपणे आजमावण्याची, त्यांचा आत्मविश्वास वाढण्याची व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला उत्तेजन देण्याची संधी मिळते.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search