Next
‘काव्यप्रतिभा’ पुरस्कार भाग्यश्री देसाई यांना जाहीर
BOI
Tuesday, April 23, 2019 | 04:49 PM
15 0 0
Share this article:

भाग्यश्री देसाईपुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान व श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘काव्यप्रतिभा’ पुरस्कार या वर्षी कवयित्री व प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांना जाहीर झाला आहे. भाग्यश्री देसाई यांना त्यांच्या ‘आषाढ’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

‘सोमवारी, २९ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. नॅशनल शिपिंग बोर्डचे चेअरमन  प्रदीप रावत यांच्या हस्ते देसाई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी माजी नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्ती शिलेदार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतील. रोख एक हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे,’ अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी दिली. 

‘कवितेच्या प्रातांत भरीव काम करणाऱ्या व्यक्तीस किंवा काव्यसंग्रहास ‘काव्यप्रतिभा’ पुरस्कार दिला जातो. या पूर्वी शरद कुलकर्णी, निर्मला देशपांडे, संजीवनी बोकील, अनिल कांबळे, भूषण कटककर, विसुभाऊ बापट, डॉ. माधवी वैद्य, शिरीष चिटणीस, ज्योत्स्ना चांदगुडे, स्वाती सामक, उद्धव कानडे, बंडा जोशी व सतीश राऊत यांना प्रदान करण्यात आला आहे,’ असेही आडकर यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search