Next
‘साईश्री’मध्ये ९२ वर्षीय रुग्णावर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:पुणे : येथील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे ९२ वर्षांच्या व्यंकटेश कुलकर्णी यांच्यावर अवघड अशी गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुळचे कर्नाटकचे असलेले कुलकर्णी यांची वयाच्या ८३ व्या वर्षी डाव्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती; परंतु काही दिवसांपूर्वी चालताना त्यांच्या उजव्या गुडघ्यामध्ये अचानक वेदना होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दाखविले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा एक्स-रे काढला असता, कुलकर्णी यांचा गुडघा बरा होण्यासाठी शस्त्रक्रीयेशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले; परंतु काही कारणामुळे त्यांना हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला.

‘साईश्री हॉस्पिटल’चे संचालक आणि सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. नीरज आडकर यांनी कुलकर्णी यांना तपासले असता त्यांच्या असे लक्षात आले की, कुलकर्णी यांना बेडवरदेखील हालचाल करता येत नव्हती; तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर वेदना सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांची त्वरीत टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

या विषयी अधिक माहिती देताना डॉ. आडकर म्हणाले, ‘ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी खूप कठीण होती. कारण रुग्णाचे वय खूप जास्त असल्याने आम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे होते; परंतु कुलकर्णी यांनी उत्तम असे सहकार्य केल्यामुळे आम्हांला ही शस्त्रक्रिया करणे सोपे गेले.’

‘साईश्री हॉस्पिटल’च्या भूलतज्ज्ञ डॉ तृप्ती पारे म्हणाल्या, ‘कुलकर्णी यांचे वय लक्षात घेता आम्ही त्यांना पूर्णपणे भूल दिली नाही, तर फक्त त्यांच्या पायाला भूल दिली. ज्यामुळे त्यांना कमीत कमी त्रास होईल याचा आम्ही प्रयत्न केला. कुलकर्णी यांना सेगमेंटल एपिड्युलरवर रुग्णाचे व्यवस्थापन करण्यास ठेवण्यात आले होते. त्यांचे वय व कार्डीओलॉजिकल स्थितीदेखील आव्हानात्मक होती.’

कुलकर्णी म्हणाले, ‘माझे हृदय अजूनही तरुण आहे आणि माझ्यामध्ये खूप ऊर्जा आहे. मी माझे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले आहे. शस्त्रक्रियेनंतरही मी माझ्या पायावर उभे राहू शकतो आणि चालूदेखील शकतो. यासाठी मी डॉ. नीरज आडकर आणि संपूर्ण हॉस्पिटलचे आभार मानतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search