Next
‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’चे आयोजन
ढेपेवाडा येथे २४ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय सहल
प्रेस रिलीज
Tuesday, November 20 | 10:43 AM
15 0 0
Share this story

पुणे : येथील जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढेपेवाडातर्फे २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’ या उपक्रमाचे आणि एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत सात ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी पालकांसह सहलीत सहभागी होता येणार आहे. यात ‘चिंटू’चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित हे सहभागी मुला-मुलींना, पालकांना ‘चिंटू’ची रेखाटने करून दाखवणार आहेत. ढेपेवाडाचे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे या पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवणार असून, वाडासंस्कृतीतील रहाणीमानाची ओळख करून देणार आहेत.

ढेपेवाडा
या वेळी माहिती देताना नितीन ढेपे म्हणाले, ‘ढेपेवाडा हा  मुळशीच्या गिरीवन पर्यटनप्रकल्पात असलेला पुणेरी वाडा असून वाड्याची सर्व वास्तू वैशिष्ट्ये येथे पाहावयास मिळतात. जुनी संस्कृती जपण्यासाठी खास ढेपेवाडा बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा आनंद देणारे पुण्यातील हे एकमेव पर्यटनस्थळ आहे.’

उपक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, २४ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी चार
स्थळ : ढेपेवाडा, गिरीवन, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२२६ ४०५९९, ९७६३२ ७६२३२
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link