Next
‘विक्स अॅक्शन’ला बंदी आणलेल्या औषधांमधून वगळले
प्रेस रिलीज
Tuesday, September 18 | 03:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच जारी केलेल्या सूचनेनुसार विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्राला बंदी आणलेल्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या बंदीबाबतच्या सर्वात ताज्या सूचनेची भारत सरकारच्या ई-गॅझेटच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.

‘आम्ही ‘विक्स’मध्ये नेहमीच स्थानिक कायद्याच्या चौकटीतच राहूनच काम केले जाते आणि आमच्या ग्राहकांचे आरोग्य, सुरक्षितता व स्वास्थ्य या आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याच्या गोष्टी राहिल्या आहेत,’ असे ‘विक्स’तर्फे सांगण्यात आले.

सर्दी आणि खोकल्यावरील जगातील सर्वाधिक खपाची औषधे बनविणारा ब्रँड असलेल्या ‘विक्स’कडे भारतासह ६० हून अधिक देशांच्या सरकारी नियामक यंत्रणांची मान्यता असलेली उत्पादने आहेत आणि गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांपासून आराम देणारे विश्वासार्ह उपचार हा ब्रँड पुरवत आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link