Next
माझं तालमय जीवन- झाकीर हुसेन
BOI
Tuesday, March 05, 2019 | 10:09 AM
15 0 0
Share this article:

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे वडील खूप आजारी पडले. त्यामुळे बाळ अपशकुनी ठरले. हे बाळ म्हणजेच भविष्यात तबलावादक, संगीतकार व तालतज्ञ म्हणून जगभरात ख्यातकीर्त झालेले झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील म्हणजे पंडित अल्लारखाँ. वडिलांशी असलेले नाते उलगडत त्यांनी स्वतःचा जीवनपट ‘माझं तालमय जीवन’मधून उलगडला आहे.

प्रश्नोत्तराच्या स्वरूपात यात झाकीर हुसेन यांच्या बालपणापासूनच्या आठवणी आहेत. आईने त्याकाळी त्यांना इंग्रजी व मुलींना उर्दू शाळेत घालणे, माहिमला एका खोलीत राहत असताना नंतर अक्रम टेरेसमधील प्लॅट व नंतर नेपियन सी रोडला सिमला हाउसमध्ये राहायला जाणे, यातून अम्माची दूरदृष्टी व जिद्द दिसून येते, असे ते म्हणतात.

अब्बांमुळे दिग्गज कलाकारांचे सान्निध्य, सहवास मिळाला हे सांगताना झाकीर हुसेन यांनी उस्ताद अली अकबरखाँ गुलाम अलीखाँ साहेब, पंडित रवी शंकर, पंडित शिवकुमार शर्मा अशा अनेक नामवंतांच्या आठवणी व स्वतःच्या तालमय जीवनाची कहाणी यातून कथन केली आहे. याच्या संवादक नसरीन मुन्नी कबीर असून, प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केला आहे.     
      
पुस्तक : माझं तालमय जीवन- झाकीर हुसेन
लेखक : नसरीन मुन्नी कबीर
अनुवादक : प्रणव सखदेव
प्रकाशक : अमरल प्रकाशन
पाने : १८०
किंमत : २९५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search