Next
‘आषाढी’निमित्त रत्नागिरीत गीत, नृत्य, रंगांचा त्रिवेणी संगम
BOI
Saturday, July 21, 2018 | 10:57 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : बाळासाहेब हिरेमठ परफॉर्मिंग आर्ट्स अॅकॅडमी यांच्या सहकार्याने आणि स्वराभिषेक व साईश्री नृत्यवर्ग यांच्या विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘विठू पंढरी पाहिला’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात गायन, नृत्य आणि रंगांचा त्रिवेणी संगम साधण्यात आला आहे. हा कार्यक्रम २३ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.  

विनया परब यांच्या स्वराभिषेक संगीतवर्गाचे शिष्य भक्तिगीते, अभंग सादर करणार असून, साईश्री नृत्यवर्गाच्या मिताली भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या या भक्तिगीतांवर भरतनाट्यम सादर करणार आहेत. गायन आणि नृत्याद्वारे विठूनामाचा गजर सुरू असतानाच रंगमंचावर रंगांचा आविष्कारही पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी स्कूल ऑफ आर्ट्समधील आर्ट टीचर पदविकाधारक आणि सध्या मुकुल माधव फाउंडेशनच्या शाळेत संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मधुर लाकडे या कार्यक्रमादरम्यान कॅनव्हास विठ्ठलाची प्रतिमा साकारणार आहेत.

मंगेश चव्हाण (पखवाज), केदार लिंगायत (तबला), मंगेश मोरे (सिंथेसायझर), सुनील बेंडखळे आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) हे साथसांगत करणार आहेत. आराध्या साउंडचे सुरेंद्र गुडेकर यांचे ध्वनीसंयोजन असून, सुनिता पाटणकर निवेदनातून श्री विठ्ठल आणि संतांचे कार्य उलगडणार आहेत.

या कार्यक्रमासाठी जयेश मंगल पार्कचे अॅड. राजशेखर मलुष्टे, मनोज पाटणकर, महेंद्र पाटणकर, विराज परब, सौ. बाणे यांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमादरम्यान समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या टीमच्या वतीने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका गरजू व होतकरू विद्यार्थ्याला कै. आनंद प्रभुदेसाई शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
सोमवार, २३ जुलै २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रस्ता, माळनाका, रत्नागिरी. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search