Next
‘खुला आसमान’तर्फे कलाकृतींचे प्रदर्शन
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

वैष्णवी पुणतांबेकर हिने रेखाटलेले चित्रपुणे : ‘खुला आसमान’तर्फे पुणे विभागांतील पदक विजेत्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ जुलै ते १२ ऑगस्ट २०१८ या कालावधीत इंडिया आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळेत रविवारी देखील सर्वांसाठी खुले राहणार आहे.

ऋतिका जोशी हिची कलाकृतीमुलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीसाठी ‘खुला आसमान’ हे व्यासपीठ आहे; तसेच ‘खुला आसमान’तर्फे मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. प्रत्येक तिमाहीत, एक शॉर्टलिस्ट तयार केली जाते आणि प्रत्येक शॉर्टलिस्ट झालेल्या मुलासाठी ‘खुला आसमान’तर्फे एक समर्पित वेबपेज तयार केले जाते. हे समर्पित वेबपेज पुढील तीन वर्ष ठेवण्याची व्यवस्था केली जाते. शॉर्टलिस्ट केलेल्या कलाकृती आणखी एका फेरीतून परीक्षण करून पदक विजेत्यांची निवड केली जाते.

आतापर्यंत तिमाही स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या ३७ कलाकृतीं या प्रदर्शनात सादर केल्या जाणार आहेत. ‘खुला आसमान’तर्फे पदक विजेत्या कलाकृतींची प्रदर्शने देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.

अमिता सरोया हिचे चित्रशाळेतील मुले, पालक आणि शिक्षकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ‘खुला आसमान’तर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देणार्‍या मुलांसाठी इंडिया आर्ट गॅलरीच्या परिसरात स्केचिंग व पेंटींग करण्याची व्यवस्था केलेली आहे.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
२१ जुलै ते १२ ऑगस्ट २०१८
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सात
स्थळ : इंडिया आर्ट गॅलरी, लावण्य, प्लॉट क्र. ३०, भोसलेनगर, रेंजहिल्स रस्त्याजवळ, पुणे​​ ४११ ००७.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search