Next
दीपिका पदुकोण ‘मामि’ची नवी अध्यक्षा
BOI
Monday, February 04, 2019 | 12:57 PM
15 0 0
Share this article:

दीपिका पदुकोणमुंबई : बॉलीवूडमधील सध्याच्या टॉप अभिनेत्रींमध्ये असलेली दीपिका पदुकोण हिची ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज’ म्हणजेच ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने भारावले असल्याचे दीपिकाने म्हटले आहे. 

भारतीय चित्रपटांसंदर्भात कार्य करणाऱ्या देशातील प्रमुख संस्थांमध्ये ‘मामि’ची गणना केली जाते. या संस्थेमार्फत मुंबईत दर वर्षी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. या संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. दीपिकापूर्वी अभिनेता आमीर खानची पत्नी किरण राव या पदावर होत्या. किरण राव यांनी चार वर्षे ही जबाबदारी सांभाळल्यानंतर नुकतीच त्यांनी पुढील सुत्रे दीपिकाच्या हाती सोपवली असून त्यांनी या कार्यासाठी दीपिकाला शुभेच्छाही दिल्या आहेत. 

दीपिका पदुकोण आणि किरण रावआपल्यासाठी ही एक खूप मोठी जबाबदारी असल्याचे दीपिकाने म्हटले आहे. ‘‘मामि’ला स्वतःची अशी एक दिशा आहे, एक ओळख आहे. ती कायम ठेवून त्या दृष्टीने आणखी मोठी वाटचाल करण्यासाठी आपला प्रयत्न असेल. भारतासारख्या चित्रपटप्रिय देशात चित्रपटासाठी पुरक असा एक चित्रपटप्रेमी समुह तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे मत दीपिकाने व्यक्त केले आहे. 

दरम्यान नीता अंबानी, करण जोहर, ईशा अंबानी, रोहन सिप्पी, जोया अख्तर, विक्रमादित्य मोटवानी हेदेखील ‘मामि’चे सदस्य आहेत. ‘माझा ‘मामि’सोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आणि औत्सुक्यपूर्ण होता. तो तसाच दीपिकासाठीही ठरो, यासाठी तिला खूप शुभेच्छा’, असे मत ‘मामि’च्या माजी अध्यक्षा किरण राव यांनी व्यक्त केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search