Next
नृत्य आणि नाट्य यांच्या मिलाफातून उलगडणार विवेकानंद
‘तेजोनिधी’ या नृत्यनाट्य कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Tuesday, February 12, 2019 | 02:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘विवेकानंद केंद्र’ निर्मित स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक विचारांवर आधारित ‘तेजोनिधी’ या प्रेरणादायी नृत्यनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगणा स्वाती दैठणकर या वेळी नृत्य सादरीकरण करणार आहेत. 

मंगळवार, १९ फेब्रुवारीला सायंकाळी टिळक स्मारक मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे सामाजिक हेतूने मदतनिधी उभारण्याचे कार्य केले जाते. याच कार्याचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार नृत्य आणि नाट्य यांच्या मिलाफात पाहण्याची संधी पुणेकरांना याद्वारे मिळणार आहे. 

कार्यक्रमात भरतनाट्यम् नृत्यांगणा डॉ. स्वाती दैठणकर आणि त्यांचे सहकलाकार नृत्य सादरीकरण करतील. रघूनंदन पणशीकर आणि विभावरी जोशी हे गायनाची साथ करणार आहेत. संगीत दिग्दर्शन डॉ. धनंजय दैठणकरांचे असून नुपूर दैठणकर-बाग या स्वामी विवेकानंदांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कार्यक्रमासाठी रुपये १५० आणि १०० अशा देणगी प्रवेशिका ठेवण्यात आल्या असून, टिळक स्मारक मंदिर याठिकाणी रविवार (१७ फेब्रुवारी)पासून या प्रवेशिका उपलब्ध असतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search