Next
पक्षीमित्र शिंगारे दांपत्याशी ‘जीविधा’ कट्टयावर संवाद
BOI
Monday, September 24, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘जीविधा’, निसर्गसेवक व ‘देवराई ट्रस्ट’ यांच्या वतीने सांगली येथे जखमी पक्ष्यांना वाचवण्याचे काम करणारे पक्षीमित्र दांपत्य सचिन शिंगारे व सुनीता शिंगारे यांची मुलाखत बुधवारी, २६सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे’, अशी माहिती ‘जीविधा’चे संचालक राजीव पंडीत यांनी दिली.

सचिन शिंगारे
‘चित्कला कुलकर्णी व उमेश कुलकर्णी हे शिंगारे दांपत्याशी संवाद साधणार आहेत. सचिन व सुनीता शिंगारे यांनी आजपर्यंत अनेक जखमी पक्षांना औषधोपचार करून निसर्गात परत सोडले आहे. त्यांच्या परीसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे पक्षांना घरटी बांधायला जागा नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कृत्रिम घरटी बांधली. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही हे जोडपे गेली अनेक वर्षं पदरचे पैसे घालून पक्षी संवर्धनाचे काम करत आहे.

सुनीता शिंगारे
आजवर हजाराहून अधिक पक्ष्यांना त्यांनी जीवदान दिले असून, सहा हजारांहून अधिक घरटी तयार केली आहेत. मंदिरे, सामाजिक संस्था अशा अनेक ठिकाणी त्यांनी विनामुल्य घरटी लावली आहेत. दरवर्षी २० मार्च रोजी,चिमणी दिनानिमित्त ते मुलांसाठी पक्ष्यांची चित्र काढण्याची स्पर्धा, तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन करतात. यात सहभागी होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना घरटे किंवा पक्ष्यांसाठी दाणापाणी ठेवण्यासाठी ताटली बक्षीस म्हणून दिली जाते.  अनेक शाळांमधून घरटी तयार करण्याच्या कार्याशाळाही ते घेतात’,असेही पंडित यांनी नमूद केले. 

कार्यक्रमाविषयी 
जीविधा कट्टा - सांगलीचे पक्षीमित्र शिंगारे दांपत्याशी संवाद
स्थळ :  इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडूलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्रनगर, पुणे.
वेळ : बुधवारी, २६ सप्टेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search