Next
बचत गटांंतील महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, July 16, 2019 | 06:05 PM
15 0 0
Share this article:


नवी मुंबई : वरळीतील नगर परिषद प्रशासन संचालनालय पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आणि डहाणू नगर परिषद यांच्या सहकार्याने डहाणूतील लोणीपाडा कम्युनिटी हॉल येथे आयोजित सहा दिवसीय मोफत उद्योजकता विकास कार्यक्रमाची सुरुवात आज (१६ जुलै) झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
 
या कार्यक्रमास ‘एमसीईडी’ पालघरचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार, नगर परिषद उप मुख्याधिकारी  प्रदीप जोशी, शहर व्यवस्थापक वैभव येगडे, क्षेत्रीय  समन्वयक नीता दुबळा, माविम प्रतिनिधी वाडा अजित पाटील, माविम सहयोगिनी मनीषा धोडी यांसह पंडित दिनदयाल योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कर्ज मंजूर झालेल्या बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये उद्योजकीय गुण, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकांसाठी व्यक्तिमत्त्व कौशल्ये, उद्योग व्यवसाय म्हणजे काय, उद्योग व्यवसायासाठी आवश्यक घटक (जागा, वीज, पाणी, मोक्याचे ठिकाण, कच्चा-पक्का माल आदी) या बाबत मार्गदर्शन, स्थानिक स्तरावरील उद्योगसंधी, उद्योग व्यवसायाची निवड व उद्योग उभारणीतील टप्पे, उद्योग व्यवसायाचे नियोजन व कोणास कशासाठी संपर्क साधावा, विविध शासकीय योजना, उद्योगविषयक कायदे व त्याबाबतची पूर्तताविषयक माहिती, उद्योग व्यवसाय हिशोब पद्धती व आर्थिक व्यवहारांची बँकविषयक माहिती, बाजारपेठ तंत्र, वस्तूची विक्री किंमत काढणे, खेळत्या भांडवलाचे नियोजन, प्रकल्प अहवाल, अयशस्वी उद्योजकांचे मनोगत, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, ग्राहक मिळवण्याची कला, ग्राहकांचे व्यवस्थापन, उद्योग व्यवसायविषयक, यशस्वी उद्योजकांचे मनोगत, व्यवसायवृद्धी, उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन, उद्योग उभारणीचा कृती आराखडा, माहिती तंत्रज्ञानाचे व्यावसायिक महत्त्व आदी विषयांबाबत तज्ज्ञ व अधिकाऱ्यांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

बचत गटांंतील सर्व महिला सदस्य तसेच अध्यक्ष सचिव यांनी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नियमित उपस्थित राहण्याचे आवाहन ‘एमसीईडी’चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search