Next
सॅम्युअल टेलर कोलरीज
BOI
Saturday, October 21 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘वॉटर वॉटर एव्हरीव्हेअर अँड ऑल दी बोर्डस् डिड श्रिंक, वॉटर वॉटर एव्हरीव्हेअर नॉर एनी ड्रॉप टू ड्रिंक’ ही अजरामर झालेली काव्यपंक्ती लिहिणारा प्रसिद्ध इंग्लिश कवी सॅम्युअल कोलरीजचा २१ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
............

सॅम्युअल टेलर कोलरीज 

२१ ऑक्टोबर १७७२ रोजी ऑट्टरीमध्ये जन्मलेला सॅम्युअल कोलरीज हा अठराव्या शतकातला रोमॅन्टिक कवी आणि तत्ववेत्ता. आपला मित्र विल्यम वर्डसवर्थसह त्याने लिहिलेल्या ‘लिरिकल बॅलड्स’ने एका वेगळ्या प्रवाहाची सुरुवात झाली होती. 

‘फ्रॉस्ट अॅट मिडनाइट’ या कवितेतून त्याने आधी न वापरलेली बोलीभाषेसारखी एक सहज वाक्यरचना मांडली. लॉडॅनमच्या अंमलाखाली त्याने काही गूढ काव्यपंक्ती रचल्या, ज्या ‘कुब्लाखान’ नावानं प्रसिद्ध झाल्या.

बॅलड (पोवाडा) प्रकार वापरून त्यानं रचलेलं ‘दी ऱ्हाइम ऑफ दी अॅन्शंट मरीनर’ हे काव्य चांगलंच गाजलं आणि विशेषतः त्यातली ‘वॉटर वॉटर एव्हरीव्हेअर अँड ऑल दी बोर्डस् डिड श्रिंक, वॉटर वॉटर एव्हरीव्हेअर नॉर एनी ड्रॉप टू ड्रिंक’ ही ओळ तर अजरामर झाली. (इथे भा. रा. तांब्यांच्या ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही... कळा ज्या लागल्या जिवा’ची आठवण होते).

ख्रिस्ताबेल, एड्स टू रिफ्लेक्शन, वेल, दे आर गॉन अशा त्याच्या इतर रचना प्रसिद्ध आहेत. 

२५ जुलै १८३४ रोजी त्याचा हायगेटमध्ये मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link