Next
ग्रीन कॉरीडोरद्वारे आणलेल्या यकृतामुळे जीवनदान
प्रेस रिलीज
Wednesday, February 28, 2018 | 01:23 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एका ब्रेन डेड रुग्णाचे यकृत नाशिक येथून ग्रीन कॉरीडोरचा उपयोग करून, पुण्यातील बाणेरमधील ‘ज्युपिटर  हॉस्पिटल’ येथे आणण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलच्या टीमने हे यकृत नाशिकहून अवघ्या तीन तास बारा मिनिटांत आणले. यासाठी नाशिकपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरीडोर तयार करण्यात आले होते.
 
रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला नाशिकमधील ऋषीकेश हॉस्पिटलमधे २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले. परंतु रुग्णाने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.  काही  आवश्यक चाचण्या केल्यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता डॉक्टरांनी रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले. ऋषीकेश हॉस्पिटलच्या मेडिकल टीमने ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयव दानासंदर्भात समुपदेशन केले व त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.

ज्युपिटर हॉस्पिटलमधील यकृत तज्ज्ञांनी त्वरित नाशिक येथे जाऊन, ऑर्गन रिट्रीव्हलची प्रक्रिया दुपारीच पूर्ण केली. पुणे व नाशिक येथील वाहतूक पोलिसांच्या सहकार्यामुळे ग्रीन कॉरीडोरद्वारा नाशिकपासून पुण्यापर्यंत यकृत केवळ तीन तासात आणता आले.
 
याविषयी ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ डॉ. गौरव चौबळ म्हणाले, ‘कुटुंबाने अवयव दान करण्यासाठी एक उत्कृष्ट निर्णय घेतला; ज्यायोगे या प्रक्रियेचा लाभ घेत असलेल्या सर्व रुग्णांच्या जीवनाचे रक्षण करण्यात मदत झाली आहे. डॉक्टर आणि रुग्णाचे कुटुंब याबद्दल कृतज्ञ आहेत.’

ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ज्ञ सोमनाथ चटोपाध्याय  म्हणाले, ‘पुण्यात नाशिकमधून ग्रीन कॉरिडॉरनी यकृत येण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन्ही वेळेस रुग्णास असलेल्या आजारातून सावरण्याची संधी मिळाली आहे. ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या यकृत दानाचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अवयवदानाद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नवे जीवन देऊ शकते.  एका व्यक्तीच्या अवयव दानामुळे जवळपास नऊ लोकांचे प्राण वाचू शकतात. अवयवदानाबाबतीत जागरुकता वाढवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल प्रयत्न करीत आहे.’

या वेळी ज्युपिटर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव म्हणाले, ‘यासारखे अधिक लोक अवयवदानासाठी पुढे आले तर समाजाचा फायदा होईल.’ पुढे ते म्हणाले, ‘सर्वसामान्यपणे  नाशिक ते पुणे प्रवासासाठी सहा तास लागतात. ग्रीन कॉरीडोरमुळे नाशिकहून यकृत पुण्याला तीन तासात आणणे शक्य झाले. त्यासाठी आम्ही कमिशनर ऑफ पोलीस रश्मी शुक्ला, डी सी पी पुणे, कमिशनर ऑफ पोलीस रवींद्र सिंघल आणि पुणे व नाशिक  येथील ट्राफिक कंट्रोल टीमचे आभारी आहोत. तसेच, ज्युपिटर हॉस्पिटलचे ट्रान्सप्लान्ट समन्वयक सागर काकड यांनी या सर्व प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search