Next
‘आयएमईडी’च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखांपर्यंतची प्लेसमेंट ऑफर
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमधील (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या (एमबीए) विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक सात ते ५४ लाखापर्यंतच्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. १७१हून अधिक विद्यार्थ्यांना ‘ब्लू चिप’ कंपन्यात प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत.

६०पेक्षा अधिक कंपन्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये फेब्रुवारी महिन्यात कॅम्पस इंटरव्यू घेतले. त्यात विद्यार्थ्यांना करियरच्या मोठ्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या. भारतीय कंपन्यामध्ये या विद्यार्थ्यांना १६ लाख १० हजारांची वार्षिक ऑफर मिळाली, तर आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये ५४ लाख रुपयांची वार्षिक ऑफर मिळाली. या कंपन्यांमध्ये अमेझॉन, रिलायन्स, कॅपजेमिनी, आयटीसी, आदित्य बिर्ला कॅपिटल, आयसीआयसीआय, विप्रो, टेक महिंद्रा, अपोलो, नोकरी डॉट कॉम, उंनो मिंडा यांचा समावेश आहे.

‘या विद्यार्थ्यांना समर इंटर्नशिपच्या ऑफर्सदेखील प्राप्त झाल्या आहेत. याआधी ५० विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांची विंटर इंटर्नशिप पूर्ण केली आहे. यामध्ये त्यांना किमान मासिक २५ हजार रुपयांचे विद्यावेतन मिळाले. इंटर्नशिप देणाऱ्या कंपन्यामध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल, पतंजली, बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश आहे,’ असे डॉ. वेर्णेकर यांनी सांगितले.

भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ही भारताच्या टॉप ५० बी-स्कूलमध्ये समावेश असलेली इन्स्टिट्यूट असून, ‘कार्पोरेट रिसोर्स सेल’द्वारे प्लेसमेंटसाठी विशेष प्रयत्न केले जातात. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, इंडस्ट्री, इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट, अल्युमनी मीट, कार्पोरेट डे, जॉब फेयर, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम  यांसारखे उपक्रम येथे वर्षभर आयोजित केले जातात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search