Next
गुरुनानक महाविद्यालयात संविधान क्लबची स्थापना
मिलिंद जाधव
Monday, January 07 | 01:59 PM
15 0 0
Share this story



मुंबई : सायन-जीटीबी नगर येथील गुरुनानक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुमित खरात व प्राचार्य डॉ. विजय दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात संविधान क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबचे उद्घाटन अमेरिकेतील हॉवर्ड महाविद्यालयाचे डॉ. सुरज येंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.  

काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात संविधान आठवडा साजरा करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. खरात यांनी संविधानाची ओळख व्हावी म्हणून राज्यशास्त्र विभागाअंतर्गत संविधान  क्लबची संकल्पना मांडली होती. ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात आली. या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. खरात यांनी संविधान क्लबमार्फत संविधान साक्षरता अभियान राबविणार असल्याचे सांगितले.
   
या प्रसंगी डॉ. येंगडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले; तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय दाभोलकर आणि राज्यशात्र विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ. येंगडे यांच्याशी संवाद साधत विविध शंकाचे निरसन करून घेतले.

या वेळी संविधान क्लबच्या लोगोचे अनावरण करण्यात आले; तसेच क्लबची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी धनाजी शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी कौस्तुभ पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली. अफ्रिन शेख यांची सचिव म्हणून व सबा शेख यांची उपसचिव म्हणून निवड झाली.

प्रा. खरात यांनी डॉ. येंगडे, प्राचार्य डॉ. दाभोलकर, उपप्राचार्या पुष्पिंदर कौर, डॉ. मनप्रीत कौर, ग्रंथपाल नामजोशी यांचे विशेष आभार मानले. तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कौस्तुभ पोतदार याने सूत्रसंचालन केले. आफ्रिन शेख यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link