Next
औंध येथे कागदी पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Monday, September 03 | 12:27 PM
15 0 0
Share this story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण घेताना विद्यार्थी

औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कागदी पिशव्या बनविण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यात खादी ग्रामोद्योग शिवाजीनगर येथील प्रशिक्षक सुधाकर सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘प्लास्टिकच्या वस्तूंना पर्याय देण्यासाठी आमची ग्रामोद्योग संस्था कार्य करीत आहे. पर्यावरणपूरक वस्तू बनवल्यास निसर्गाचा समतोल बिघडणार नाही. अलीकडे प्लास्टिकची पिशवी वापरायला बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीला पर्याय म्हणून कागदी पिशव्यांचा वापर सर्वांनी केला पाहिजे, तरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबेल.’

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त ज्ञान मिळावे या हेतूने ही कार्यशाळा घेण्यात आली. प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी पिशवी बनविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना छोटा-मोठा उद्योग, व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. उद्योग, व्यवसाय करण्यासाठी खऱ्या अर्थाने हेच वय आहे. ज्या विद्यार्थ्यांना छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करायचे असतील त्यांच्यासाठी रयत शिक्षण संस्थेने जिल्हा उद्योग केंद्रासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. विद्यार्थ्यांनी छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय करून प्रामाणिक मार्गाने पैसा मिळवावा, तसेच कष्ट करून मोठे व्हावे.’

ही कार्यशाळा उद्योजकता विकास विभागामार्फत घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी उद्योजकता विकास विभागाच्या चेअरमन प्रा. नलिनी पाचर्णे, आयक्यूएसी विभागाच्या चेअरमन डॉ. सविता पाटील, डॉ. हर्षद जाधव, प्रा. सुप्रिया पवार, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर मॉडर्न कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link