Next
‘भारत ही आशियातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था’
आयएमएफचे प्रतिनिधी अँड्रिएस बाउर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, October 31, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अशी अर्थव्यवस्था आहे. २०१८ मधील जागतिक विकासामधील सुमारे ५० टक्के वाटा हा भारत आणि चीन या दोन देशांचा असेल’, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) भारत, नेपाळ आणि भूतान क्षेत्रासाठीचे वरिष्ठ निवासी प्रतिनिधी अँड्रिएस बाउर यांनी व्यक्त केले. मेघनाद देसाई अॅकॅडेमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएई) या भारतातील आघाडीच्या अर्थशास्त्र संस्थेद्वारे आयोजित ‘द ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलुक अँड इंप्लीकेशन्स फॉर इंडियाज इकॉनॉमी’ या चर्चासत्रात ते बोलत होते. 

अँड्रिएस बाउर
या चर्चसत्रात त्यांनी जगातील अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीचा, भारतीय अर्थव्यवस्थेला प्रभावित करणाऱ्या विविध घटकांचा आणि जगभरातील विकसनशील बाजारपेठांमध्ये भारताचे स्थान कुठे आहे, याचा आढावा घेतला.

भारताच्या विकासावर परिणाम करणाऱ्या देशांतर्गत घटकांबाबत बाउर म्हणाले, ‘नोटबंदी आणि जीएसटीमुळे नकारात्मक धक्का बसला आहे; पण हा परिणाम आता बहुतांशी कमी झाला आहे आणि आर्थिक प्रगती वेग धरू लागली आहे. या पुढच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेपुढे असलेले मुख्य आव्हान म्हणजे अधिक आव्हानात्मक असलेल्या बाह्य वातावरणाचे व्यवस्थापन करणे. भारत तेल आयात करणारा देश असल्याने तेलाच्या भावातील वाढ-घट त्यावर परिणाम करते व त्यामुळे विकास, महागाई आणि चालू खात्यातील तूट यावर परिणाम होतो. 

जागतिक प्रभावामुळे रुपया कमजोर होत आहे. कारण गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेतून आपले भांडवल पुन्हा अमेरिकेकडे वळवत आहेत, कारण तेथे दर वाढत आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीशी आपल्या अर्थव्यवस्थेला जुळवून घेण्यास मदत व्हावी यासाठी विनिमयाच्या दरात लवचिकता आणणे त्यांनी स्वागतार्ह मानले. 

‘रूपयावरील दबाव थोडा कमी करण्यासाठी आणि त्याचे अवमूल्यन रोखण्यासाठी आणखी संरचनात्मक सुधारणा होणे महत्त्वाचे आहे, असेही बाऊर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search