Next
पीएमआय, फोरेशियातर्फे भीमा नदीतील जलपर्णी निर्मूलन
BOI
Friday, June 21, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पीएमआय आणि फोरेशिया इंडिया यांनी भीमा नदीपात्रातील जलपर्णी निर्मूलनाचा उपक्रम राबविला. नुकत्याच झालेल्या या उपक्रमात २५० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उपक्रमात पवित्रा फाउंडेशन व रानजाई या सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या. 

राजगुरुनगर शहराच्या दक्षिणेला भीमा नदीवर केदारेश्वर बंधाऱ्याच्या पूर्व बाजूस शहरातील सांडपाणी साठते. त्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली आहे. या जलपर्णीमुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन परिसरातील लोकांचे आरोग्य, तसेच जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पीएमआय, पुणे शाखेने नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला, त्याला फोरेशिया कंपनीने आर्थिक पाठबळ पुरविले. फोरेशिया कंपनीच्या १५०हून अधिक कर्मचाऱ्यांनी या वेळी श्रमदानात भाग घेतला. पवित्रा फाउंडेशन व न्याती ग्रुपच्या वतीने जलपर्णी काढणारे मशीन विनामूल्य पुरवण्यात आले, तर रानजाई संस्थेने यासाठी कामगार उपलब्ध करून दिले.

५०व्या वर्धापनदिनानिमित्त पीएमआय अनेक सामाजिक प्रकल्प राबवत आहे. ‘प्रदूषित नदी स्वच्छ करून समाजाला पाठींबा देण्याची आमची ही पहिलीच वेळ आहे,’ अशी प्रतिक्रिया पीएमआय पुणे शाखेचे अध्यक्ष श्याम भावसार यांनी दिली. या वेळी पीएमआयचे सीओओ राजाराम राव बी., ओंकार गुर्जर, अमोल क्षीरसागर हे उपस्थित होते. 

‘अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. भविष्यात फोरेशिया अशा उपक्रमांना सतत पाठींबा देईल,’ असे आश्वासन फोरेशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर विद्याधर लिमये यांनी दिले. फोरेशिया कंपनीच्या ऑपरेशन्स विभागाचे जनरल मॅनेजर बट्राँड फिग्युएर्स व एच. आर. विभागाचे डायरेक्टर पवन जयप्रकाश हे मान्यवरही उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन पीएमआय पुणे शाखेचे मकरंद हरदास, संगीता कणसे, कपिल गुंज व फोरेशिया कंपनीच्या परिक्रमा टीमने केले. फोरेशिया कंपनीचे अधिकारी, राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगरसेविका रेखा श्रोत्री व नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search