Next
ग्रामीण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात
मिलिंद जाधव
Friday, August 31 | 03:26 PM
15 0 0
Share this story



भिवंडी :
ग्रामीण साहित्याने सध्या मराठी साहित्यात वेगळे वळण घेतले असून, ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या साहित्यातून  मांडल्या जात आहेत. कथा, कादंबऱ्या, कविता अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये प्रश्नांचे चित्र उमटत आहे. म्हणूनच ग्रामीण साहित्यात आपला ठसा उमटविण्यासाठी शहापूर तालुक्यासह महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लेखक कवी साहित्यिक संघटनांना एका छताखाली आणण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य परिषदेची स्थापना (ग्रामसाप) करण्यात आली आहे. राज्यातील साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी ‘ग्रामसाप’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘ग्रामसाप’चे निमंत्रक तथा ज्येष्ठ पत्रकार महेश धानके यांनी केले आहे.  

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील व ग्रामीण भागावर साहित्य लेखन करणाऱ्या साहित्यिकांना विचारपीठ मिळावे, म्हणून राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य परिषद स्थापन करण्यात येत आहे. याच परिषदेतर्फे २२ ऑगस्ट २०१८ रोजी शहापूर तालुक्यातील खातिवली येथे शिवमार्ग वाहिनीच्या सहकार्याने १०० कवींचे एक काव्यसंमेलन झाले. त्या वेळी ‘ग्रामसाप’ची प्राथमिक घोषणा करण्यात आली.

‘ग्रामसाप’ची सदस्य फी ५०० रुपये असून, सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. लवकरच जिल्हा शाखा निर्माण होणार असून, केंद्रीय कार्यकारिणीसुद्धा घोषित करण्यात येणार आहे. काव्य, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आयोजित करणे, प्रातिनिधिक व स्वतंत्र काव्यसंग्रह, पुस्तके प्रकाशित करणे, विविध साहित्य संमेलने आयोजित करणे, हा ‘ग्रामसाप’चा उद्देश आहे. 

‘आपली बोलीभाषा जतन व्हावी, ती रसिकांपर्यंत पोहोचावी, तसेच ग्रामीण भागातील कवींना विचारपीठ उपलब्ध व्हावे, हा यामागचा उद्देश आहे,’ असे डॉ. दिलीप धानके व पत्रकार महेश धानके यांनी सांगितले. 

‘ग्रामसाप’मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी महेश धानके यांच्याशी ९६८९९ ९५००० किंवा ९०४९० ३७४४४ या क्रमांकावर किंवा mahesh.dhanke7@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link