Next
‘पेटीएम अॅप’वर क्रेडिट स्कोअर मोफत पाहण्याची सुविधा
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पेटीएम’ या भारताच्या सर्वांत मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अॅपवर मोफत क्रेडिट स्कोअर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. पेटीएम वापरकर्ते त्यांच्या यूझर प्रोफाइल विभागात ‘माय क्रेडिट स्कोअर’वर क्लिक करून आपला क्रेडिट स्कोअर केवळ एक मिनिटांत पाहू शकतील.

त्या व्यतिरिक्त वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर एक तपशीलवार क्रेडिट रिपोर्ट मिळेल, ज्यात क्रेडिट खात्याच्या वयावर आधारित कर्जाचा वापर आणि परतफेडीचा इतिहास यांची माहिती असेल. याचा उपयोग करून वापरकर्ते आपले क्रेडिट रेटिंग नक्की करू शकतात, जे बहुतांशी क्रेडिट कार्ड आणि कर्ज प्रदात्यांसाठी कर्ज मंजुरीचे एक मानक झालेले आहे. या रिपोर्टमध्ये त्या सब्स्क्राइबरच्या नावाने असलेल्या सर्व सक्रिय क्रेडिट कार्ड आणि कर्ज खात्यांचा एक स्नॅपशॉट मिळेल; तसेच क्रेडिट स्कोअर कसा सुधारता येईल या व इतर बाबतीत काही उपयुक्त टिप्सदेखील मिळतील.

क्रेडिट स्कोअरच्या आधारे, वापरकर्त्यांना पेटीएम पोस्टपेडची सदस्यता, दरमहा कोणत्याही त्रासशिवाय ३० हजारांपर्यंत कर्ज अशा तात्काळ आणि खास अशा ऑफर्सदेखील मिळतात. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search