Next
‘वीर सेवा दल कोरोची’ला प्रेरणा पुरस्कार
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 12:52 PM
15 0 0
Share this story

कोल्हापूर : विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल वीर देवा दलाच्या कोरोची शाखेला वीर सेवा दल मध्यवर्ती समितीकडून प्रेरणा पुरस्कार देण्यात आला.

वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचा ३९ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री सागर चौगुले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष डी. ए. पाटील, मध्यवर्ती अध्यक्ष अरविंद मजलेकर, कार्याध्यक्ष भूपाल गिरमल, कार्यवाह शशिकांत राजोबा उपस्थित होते.

वीर सेवा दल कोरोची शाखेने पांजरपोळ अभियान, ओढा स्वच्छता, आरोग्यशिबीर, रोबोटिक शिबीर, माजी जवान सन्मान, वृक्षारोपण, बालोद्यान संस्थेस चादर वाटप, व्याख्यानमाला, मराठी शाळा व बालवाडीस शैक्षणिक मदत, युवती सक्षमीकरण शिबीर आदी अनेकविध उल्लेखनीय विधायक उपक्रम राबविले आहेत. यामुळेच वीर सेवा दल मध्यवर्ती समितीने कोरोची शाखेची प्रेरणा सन्मानासाठी निवड केली.

विविध विधायक उपक्रम राबवण्यासाठी संघनायक स्वप्नील उपाध्ये, उपसंघनायक सौरभ पाटील, जिल्हा सचिव विजय बरगाले, तालुका सदस्य शीतल पाटील, माजी संघनायक जितेंद्र चौगुले, बाहुबली उपाध्ये, राजगोंडा पाटील, वीरेंद्र कुरुंदवाडे, विपुल पाटील, बाहुबली पाटील, सुभाष खुरपे, सतीश पाटील, महेश चौगुले आदींनी परिश्रम घेतले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link