Next
पंढरपुरात फुलले तुळशीचे मळे
BOI
Thursday, July 19, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : आषाढी वारीच्या काळासह वर्षभर तुळशीहारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी तुळशीची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बहुगुणी मंजिऱ्यांनी फुललेल्या तुळशी वाऱ्यावर डुलत असल्याचे चित्र सध्या पंढरपूर परिसरात पाहायला मिळत आहे.   

पंढरपुरात विठूरायाची पूजा तुळशीशिवय होतच नाही. विठूरायाला तुळस आवडत असल्यामुळे भाविक तुळशीचे हार देवाला घालतात. त्यामुळे आषाढी वारीच्या कालावधीत तुळशीहारांना मोठी मागणी असते. ही बाब हेरून पंढरपूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तुळशीची लागवड केली आहे. या तुळशीसीच्या बागांतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे हे शेतकरी आता सुधारीत पद्धतीने तुळशीची शेती करू लागले आहेत.

पंढरपूर तालुक्यात पंढरपूर कासेगाव, लक्ष्मी टाकळी व गोपाळपूर परीसरातील काही शेतकऱ्यांनी तुळशीचे मळे फुलवले आहेत. येथील शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळात प्रत्येकी चार ते पाच गुंठे क्षेत्रावर तुळशीची लागवड केली आहे. त्यामुळे या परिसरात सुमारे दहा एकर क्षेत्रावर तुळशीची लागवड झाली आहे. अगदी थोड्चाच कालावधीत तुळशीच्या मंजिऱ्या व लाकडाचे उत्पादन मिळते. तुळशीच्या लाकडाचा उपयोग माळा बनवण्यासाठी होतो, तर मंजिऱ्यांचा उपयोग देवाला हार बनवण्यासाठी होतो. दररोज सकाळी ताज्या मंजिऱ्या तोडून शेतकरी फुलांच्या बाजारात विकतात. तर काही शेतकऱ्यांनी तुळशीच्या माळा विकणाऱ्यांच्या घरी रतीबाने मंजिऱ्या देण्यास सुरुवात केली आहे.

‘एकादशी सोडून सुट्यांच्या दिवसांतही भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असल्यामुळे तुळशीहारांना आता बारमाही मागणी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुळशीच्या बागेतून दररोज पैसा मिळू लागला आहे. आषाढी वारीच्या काळात तुळशीहारांना जास्त मागणी होत असल्यामुळे मंजिऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळत आहे,’ असे पिंटू भानवसे या शेतकऱ्याने सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दत्तात्रय भोसले, रोपळे बुद्रूक About 217 Days ago
आशा पध्दतीची तुळशीची शेती केवळ पंढरपुर परिसरातच होते . पांडुरंगाची कृपा या शेतकऱ्यांवर झाली आहे .
0
0

Select Language
Share Link