Next
७० गिटारवादकांचा अनोखा आविष्कार
BOI
Monday, January 08 | 04:59 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘म्युझिका वेना’ या संस्थेने तब्बल ७० गिटारवादकांना एका मंचावर आणून रसिकांना एका अनोख्या आविष्काराचे साक्षीदार होण्याची संधी दिली. शनिवारी (सहा जानेवारी) बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या ‘एन्डिअरिंग गिटार’ या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. अनोख्या फ्लेमँको स्टाइलचे गिटारवादन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. 

अवीट गोडीच्या जुन्या हिंदी चित्रपटगीतांबरोबर सूफी, रॉक, मेटॅलिका, डीप पर्पल, वेस्टर्न स्टाइलच्या गाण्यांच्या सादरीकरणासह भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित रचनांमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. अजित, सुजित, अमिता आणि प्रियांका या चार गायकांनी गिटारच्या साथीने एकसे बढकर एक गाणी सादर केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सॅक्सोफोनवादक अनिल करमरकर आणि प्रसिद्ध गायक दीपक महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमात की-बोर्डवर मंदार देव, ऱ्हिदम मशीनवर अभिजित भदे, ड्रम्सवर शुभम नाईक यांनी साथसंगत केली. प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी खुमासदार शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  

आठ ते साठ वर्षे वयोगटातील वादकांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात ३० ऱ्हिदम वादक, ३० मुख्य वादक, चार बास वादक आणि दोन फ्लेमँको गिटारवादक सहभागी झाले होते. ‘कर्ज’ चित्रपटातील गाजलेल्या गीतावर गिटारच्या साह्याने केलेल्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. 

या कार्यक्रमाचे संगीत संयोजन डॉ. मयुरेश केमकर यांनी केले होते, तर संकल्पना आणि निर्मिती उदय केमकर, मुक्ता केमकर यांची होती. यंदाचे या कार्यक्रमाचे पाचवे वर्ष होते. 

(या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shilpa kothari About
Mesmerizing music .No words to describe. Glad to be part of show.
0
0

Select Language
Share Link