Next
३१ वर्षांनी शाळासोबत्यांची भेट
BOI
Tuesday, May 08, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this article:

तब्बल ३१ वर्षांनी भेटलेले महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी.

संगमेश्वर (रत्नागिरी) : साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात १९८६-८७मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या परिसरात नुकताच उत्साहात पार पडला. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या ३७ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल ३१ वर्षांनी एकत्र येऊन शाळेतील आठवणींना उजाळा दिला. 

‘वर्गातील सगळ्या मुलांनी एकत्र भेटावे, अशी संकल्पना साधारण वर्षभरापूर्वी मनात आली; मात्र नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे वर्गमित्र आणि लग्न होऊन बाहेर गेलेल्या विद्यार्थिनी यांचे संपर्क क्रमांक मिळवणे अवघड होते; तरीही प्रयत्न म्हणून मुंबई येथे वास्तव्याला असणाऱ्या दोन-तीन मित्रांना फोन केला. त्यांच्याकडून काही जणांचे संपर्क क्रमांक मिळाले. त्यातूनच एक एक करत तीसहून अधिक वर्गमित्र-मैत्रिणींशी संपर्क झाला. मग सगळ्यांच्या अडीअडचणी, नोकरी, सुट्ट्या सांभाळून तब्बल ३१ वर्षांनी प्रथमच आम्ही एकमेकांना भेटलो आणि खूप आनंद झाला. हा मेळावा शाळेच्या परिसरातच आयोजित केला होता. एक पूर्ण दिवस आम्ही शाळेत आणि शाळेतल्या जुन्या आठवणींत रमत घालवला. सर्वांनाच खूप आनंद झाला होता,’ अशी भावना संतोष लोटणकर यांनी व्यक्त केली.

‘सकाळी आठ वाजता आम्ही शाळेत जमलो. एकमेकांचा परिचय करून घेतल्यानंतर काही करमणुकीचे कार्यक्रम सादर केले. दुपारी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला. त्यानंतर प्रत्येकाने आपण ३१ वर्षांच्या प्रवासात काय केले याचे अनुभव सांगितले. परदेशात वास्तव्यास असणारे आमचे वर्गमित्र मंदार जोगळेकर यांची मुलाखत सुमारे तासभर चालली. मंदार जोगळेकर परदेशात राहत असले, तरी त्यांची नाळ आपल्या गावाशीच जोडली आहे हे त्यांनी वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. 

गप्पा-गोष्टीत रंगलेले वर्गमित्र

एक दिवस शाळेत आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत घालवल्यानंतर दर वर्षीच असे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा एकमुखी निर्णय या वेळी सर्वांनी घेतला. या मेळाव्याच्या आयोजनात संतोष लोटणकर, विजय देवस्थळी, सुनील पवार, अजय सावंत, अर्चना नवाथे, विकास शिंदे, रामचंद्र घाणेकर, शंकर वैद्य, विद्या सुर्वे, संगीता घागरे, संतोष लिंगायत, रमेश शिंदे, संजय कांबळे, श्री. दुधाणे, प्रकाश घाग, श्री. कनावजे, महेश पोवार, बाबू पोवार, अरुणा घाणेकर-जोगळेकर, पत्याणे, बेर्डे, मुर्तुजा पटेल, हसीना रावणेकर, मंगेश कात्रे, नितीन साळसकर आदींचा सहभाग होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search