Next
प्रशांत सिनकर यांना ‘ठाणे रत्न’ पुरस्कार
BOI
Monday, August 26, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:



ठाणे :
पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर यांना ठाणे फर्स्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल ‘ठाणे रत्न’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ यांचे वंशज, ज्येष्ठ इतिहासकार नामदेवराव जाधव यांच्या हस्ते २५ ऑगस्ट रोजी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ठाणे फर्स्ट फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष संजय घाडीगावकर यांच्या संकल्पनेतून वागळे इस्टेटमधील किसननगर येथील महापालिका शाळेत ‘उद्योजक शिवाजी महाराज’ या एका आगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. नामदेवराव जाधव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन उपस्थित तरुणांना मिळाले. 

याच कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांचा, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी प्रशांत सिनकर यांना ‘ठाणे रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या अगोदर प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा शि. म. परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत नेपाळ इको-२०१३ पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरणभूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन ठाणे गौरव सारस्वत चैतन्य, रोटरी क्लब ऑफ ठाणे इस्टच्या वतीने दिला जाणारा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सिनकर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरही लेखन करतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search