Next
अच्युतराव पटवर्धन स्मृती वक्तृत्व स्पर्धा; पूजा कात्रे, श्रद्धा कुलकर्णी प्रथम
BOI
Tuesday, September 04 | 02:24 PM
15 1 0
Share this story

भारत शिक्षण मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह (मागे उभे) परीक्षक व मान्यवर.

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळातर्फे गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिक्षक गटामध्ये पूजा कात्रे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पूजा कात्रे रत्नागिरीतील कुवारबाव येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, मराठी विषयाचे अध्यापन करतात. विद्यार्थी गटामध्ये श्रद्धा कुलकर्णी पहिली आली.

शिक्षक गटासाठी ‘माझा अनोखा शालेय उपक्रम’ व ‘बदलत्या काळात शिक्षकाची भूमिका’ हे विषय होते. ‘मी शिक्षक झालो तर..’ आणि ‘माझ्या कल्पनेतील आदर्श शिक्षक’ हे विषय विद्यार्थ्यांना दिले होते. एकूण ७१ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
शिक्षक गट : पूजा कात्रे, प्रांजल मोहिते, डॉ. निधी पटवर्धन, 
उत्तेजनार्थ : इम्तियाज काझी, सुप्रिया टोळ्ये, नमिता वैद्य, श्रीहर्ष आपटे, आनंद शेलार. 
विद्यार्थी गट : श्रद्धा कुलकर्णी, कल्पजा जोगळेकर, ओंकार काणेकर. 
उत्तेजनार्थ : हर्ष नागवेकर, रिया पटवर्धन, आर्या वंडकर, वर्षा काळे, सानिका मोडक.

स्पर्धेचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, सहकार्यवाह विनय परांजपे, संजय जोशी, मुख्याध्यापक विजय वाघमारे यांच्या उपस्थितीत झाले. अतुल पित्रे, गणेश गुळवणी, अनिल दांडेकर, मिलिंद टिकेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन योगिनी भागवत, संदीप कांबळे यांनी केले. आभार विश्वनाथ शिंदे यांनी मानले.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link