Next
‘ग्रंथाली’च्या वाचक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
BOI
Thursday, December 06, 2018 | 05:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गेली ४४ वर्षे सातत्याने वाचनसंस्कृती रुजवण्याकरता कार्यरत असलेल्या ‘ग्रंथाली’तर्फे तीन वर्षांपासून २४ व २५ डिसेंबर असे दोन दिवस वाचक दिन साजरा करण्यात येतो. यामध्ये वाचनसंस्कृतीशी निगडित विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा युवापिढीला या उपक्रमांशी जोडण्याच्या उद्देशाने ‘ग्रंथाली’ने विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये अभिवाचन स्पर्धा, ‘आई’ या विषयावरील लेख आणि काव्य स्पर्धा यांचा समावेश आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही २४ व २५ डिसेंबर रोजी कीर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि तेथील विविध सभागृहांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत.

अभिवाचन स्पर्धेमध्ये कविता व नाट्यांश वगळता अन्य कोणत्याही साहित्याचे दहा मिनिटांच्या कालावधीत वाचन करता येईल. स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई केंद्रासह अन्य केंद्रांवरही १६ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी मुंबईत होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा. मुंबई केंद्रासाठी : चंद्रकांत मेहेंदळे -९३२३४८७०२५ , मृण्मयी भजक - ९४२२५३५०८४, नाशिक केंद्रासाठी : पुस्तक पेठ - ९१५८६८४५७४, कोल्हापूर केंद्रासाठी : सुधांशू नाईक- ९८३३२९९७९१ , राहुल कुलकर्णी - ९४२२०४४४६१, पुणे केंद्रासाठी : पुस्तक पेठ - ९८२२००३४११, माधव वैशंपायन- ९८८१०६५८७७, ठाणे (अंबरनाथ ) केंद्रासाठी : राजेश नाडकर - ९३२३०३७७२३ यांच्याशी संपर्क साधावा. 

प्रवेशाची अंतिम तारीख १० डिसेंबर २०१८ असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वानुसार केवळ ६० संघांना प्रवेश देण्यात येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

दुसरी स्पर्धा ‘आई’ या विषयावरील लेख आणि काव्यलेखनाची आहे. यामध्ये ‘मु . पो. आई : संपादकाचे मातृस्मरण’ (संपादन : संदीप काळे), ‘पंखाविना भरारी’ ( शरयू घाडी) आणि ‘आमची आई’ ( किशोर कुलकर्णी) या ‘ग्रंथाली’ ने प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांच्या निमित्ताने ‘आई’ या विषयावरील ८०० शब्दांत लेख लिहिण्याची आणि ‘आई’ या विषयावरील स्वरचित काव्य पाठवण्याची अशा दोन स्पर्धा होणार आहेत. 

स्पर्धकांनी लेख आणि कविता granthalimukkampostaai @ gmail. com या मेलवर पाठवायच्या असून, या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. ही स्पर्धा फक्त महाविद्यालीन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आहे. लेख आणि कविता पाठविण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०१८ आहे. स्पर्धकांनी आपला पत्ता आणि इमेल आयडी देणे आवश्यक आहे. यात प्रथम प्राप्त होणाऱ्या दोन हजार लेख आणि काव्यांचा समावेश केला जाईल. फक्त विजेत्यांना २३ डिसेंबर रोजी इमेलद्वारे निकाल कळवला जाईल.

पहिल्या २५ लेखांचे व काव्यांचे पोस्टर प्रदर्शन २४ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी चार वाजता कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावर मांडण्यात येईल. पारितोषिक वितरण २५ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होईल. 

या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. लतिका भानुशाली ( ९३२२२ ०७८७८ ), संदीप काळे ( ९८९०० ९८८६८ ) यांच्याशी संपर्क साधावा. 
  
 या स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक दोन हजार रुपये रोख व पुस्तकभेट, द्वितीय पारितोषिक एक हजार पाचशे रुपये रोख व पुस्तकभेट आणि तृतीय पारितोषिक एक हजार रुपये रोख व पुस्तकभेट असे असेल. 

‘या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अधिकाधिक संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन ‘ग्रंथाली’तर्फे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर व कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी केले आहे.  
 
कार्यक्रम : ग्रंथाली वाचक दिन सोहळा
ठिकाण : कीर्ती महाविद्यालय, दादर 
दिवस व वेळ : सोमवार, दि. २४ व मंगळवार, दि. २५
                       सकाळी १० वाजल्यापासून 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
vithal marathe About 201 Days ago
Granthali vachk dina nimitt " MALA AVDLELE PUSTK ashi sprdha jahir zali hoti.Tya sprdhecha nikal kadhi ahe
1
0

Select Language
Share Link
 
Search