Next
झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश
ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचा उपक्रम
प्रशांत सिनकर
Thursday, August 23, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this storyठाणे :
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ हा संदेश केवळ उक्तीपुरताच न ठेवता ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तो प्रत्यक्ष कृतीत आणला आहे. पर्यावरणपूरक वस्तूंपासून बनविलेल्या राख्या झाडांना बांधून त्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले आहे. झाडे आपले रक्षण करतातच; पण त्यांच्याही रक्षणाची गरज आहे, असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. न्यू इंग्लिश स्कूलसह ‘नेचर अॅक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल अॅप्रोच’ (नासा) या संस्थेचेही सहकार्य या उपक्रमाला लाभले.

‘नासा’ संस्थेने टाकाऊ वस्तू आणि पाने, फुले, गवत, करवंट्या, सुतळी अशा सामग्रीच्या साह्याने तयार केलेल्या राख्या न्यू इंग्लिश स्कूलमधील ६० विद्यार्थ्यांनी ठाणे शहरातील नौपाडा भागातील राम मारुती रस्त्यावरील काही झाडांना बांधल्या. बहीण भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर टाकते. सध्या निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी माणसाने घेतली पाहिजे. म्हणूनच या विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘तुम्ही झाडांना वाचवा, ती तुम्हाला वाचवतील’ असा संदेश दिला आहे. विविध आकारांतील राख्यांवर पर्यावरण वाचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे विविध संदेश लिहिले होते.

या कार्यक्रमाला शाळेचे विश्वस्त आल्हाद जोशी, जलशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद साळसकर, मुख्याध्यापक भानुदास तुरुपमाने, ‘नासा’चे राजीव डाके, , प्रतिभा काटकर, राजेश आखडमल, पी. आर. टोम्पे आदी उपस्थित होते.

मानवाकडून सध्या होत असलेली वृक्षतोड आणि अन्य विविध कामांमुळे पर्यावरणाची जैविक साखळी धोक्यात आली आहे. भूतलावरील जीवसृष्टीला नैसर्गिक आपत्तीचा धोका होऊ नये, म्हणून पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती होऊन त्यांच्या माध्यमातून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्याचे संवर्धन केले जावे, यासाठी ‘नासा’ या पर्यावरणवादी संस्थेने पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दीपक कर्पे About 177 Days ago
खूप छान उपक्रम
1
0

Select Language
Share Link