Next
समाजसेवेतून गणेशसेवेचा वसा
पुण्यातील कावेडिया कुटुंबीयांचा उपक्रम
BOI
Friday, September 06, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

ललित कावेडिया यांनी यंदा साकारलेली शिर्डीच्या साईबाबा मंदिराची प्रतिकृती आणि तिथे आमंत्रित करण्यात आलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची गर्दी

पुणे : आपल्या घरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात समाजातील दुर्बल, वंचित घटकांना सामील करून घेण्याची परंपरा लुल्लानगर येथील कावेडिया कुटुंबाने गेली काही वर्षे जोपासली आहे. त्यांनी गणेशोत्सवाला एक आगळे परिमाण दिले आहे. 

ललित कावेडिया पाहुण्या मुलांसह

ललित कावेडिया आणि मीना कावेडिया यांच्या घरी ११ दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. या सोहळ्यात ते गरीब, दिव्यांग, अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेतात. या कुटुंबातील नव्या पिढीतील सदस्य रिया आणि रेयांश हेही आनंदाने ही परंपरा पुढे नेत आहेत.
यंदा कावेडिया कुटुंबातर्फे सूर्योदय सोशल फाउंडेशनमधील २०० मुले आणि जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील शंभर ज्येष्ठांना घरी बोलावून त्यांचे आदरातिथ्य करण्यात आले. या पाहुण्यांना कपडे देण्यात आले. तसेच त्यांची मोफत दंततपासणीही करण्यात आली. 


सात सप्टेंबर रोजी त्यांनी सेवाधाम संस्थेच्या दिव्यांग बालकांना आदरातिथ्यासाठी निमंत्रित केले आहे. या वर्षी कावेडिया कुटुंबीयांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिराची भव्य प्रतिकृती तयार करून गणपतीची सजावट केली आहे.


या उपक्रमाबद्दल माहिती देताना ललित कावेडिया म्हणाले, ‘गणपतीबाप्पा हा सर्वांचाच लाडका देव आहे. आमच्या घरी गेली अनेक वर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याच्या कृपेने आपल्याला जे लाभले आहे, त्यातून समाजासाठी काहीतरी करावे, या उद्देशाने आम्ही आमच्या घरगुती उत्सवात समाजातील वंचित घटकांनाही सामील करून घेण्यास सुरुवात केली. माझी पत्नी, मुले आणि अन्य कुटुंबीयांनीही या उपक्रमाला पाठबळ दिले. दर वर्षी वेगवेगळ्या संस्थामधील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना बोलावून त्यांचे आदरातिथ्य करतो. आम्ही स्वतः जातीने उपस्थित राहून त्यांना जेवण वाढतो, त्यांची सेवा करतो. चांगले सुग्रास अन्न त्यांच्या मुखात गेल्यामुळे त्यांना होणारा आनंद बघून आम्हालाही खूप समाधान वाटते. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आमचे श्रम सत्कारणी लागल्यासारखे वाटते. आमचा हा वसा असाच पुढे नेण्याची शक्ती लाभू दे, अशी प्रार्थना आम्ही बाप्पाकडे करतो.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search