Next
भाजपतर्फे वह्यावाटप आणि गुणवंतांचा गुणगौरव
BOI
Wednesday, July 24, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : भारतीय जनता पक्ष व कोपरी, ठाणे (पूर्व) येथील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने विभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यावाटप व दहावी, बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न राहता त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे या हेतूने भाजप व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांनी ठाण्यातील (पूर्व) भरत चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय व कै. मधुकर ठाणेकर वृत्तपत्र वाचनालय या दोन ठिकाणी विभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा आणि गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. 

या वेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या हस्ते सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी भावना भरत चव्हाण, ओमकार चव्हाण, रत्नाकर सावंत, अमरीश ठाणेकर, अनिल निळे, अनिल आंग्रे, सुवर्ण अवसरे, मीनल ठाणेकर, सौ. तरे आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या १५ वर्षांपासून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले जात असून, दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला जात असल्याची माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search