Next
मुंबईत ३१ जानेवारीला शेतकरी साहित्य संमेलन
BOI
Saturday, November 25 | 05:03 PM
15 0 0
Share this story

नागपूर : शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य क्षेत्राकडून कृषीजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके राहतील. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे कार्याध्यक्ष असणार आहेत. या संमेलनात शेतकऱ्यांशी संबंधित तंत्रज्ञान, स्वामिनाथन आयोग, कायदे आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. या परिसंवादात साहित्यिक, शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

संमेलनाविषयी :

दिवस : ३१ जानेवारी २०१८
स्थळ : पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link