Next
स्वप्नील पोरे यांना ‘गीतकार मजरुह सुलतानपुरी’ पुरस्कार
BOI
Tuesday, February 05, 2019 | 02:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘बलराज सहानी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’च्या वतीने दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘गीतकार मजरुह सुलतानपुरी पुरस्कार’ चित्रपट अभ्यासक व कवी स्वप्नील पोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
रविवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्य सैनिक भाई टिळेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ. दीपक सोनार, संतोष भंडारी, सुजाता निंबाळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

स्वप्नील पोरे यांनी ‘दूर कोई गाए’, ‘ह्रिदम किंग’, ‘ओ. पी. नय्यर’, ‘प्राण’ आणि ‘एसडी-आरडी’ ही चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांवर आधारित पुस्तके लिहिली आहेत. असंख्य मासिके आणि नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विविध प्रतिष्ठित व्यासपीठांवरून त्यांनी कविता सादर केल्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search